Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी ३० जुन,२०२२ पर्यंत आधार नोंदणी करुन घ्यावी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि.19 (जिमाका वृत्तसेवा) : – केंद्र शासनाची अधिसूचना दि २२ मार्च, २०२२ रोजी मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर्स अफेअर्स फूड ॲड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, भारत सरकार यांचेकडील पत्र क्र. FNo. 9-२/२०१६-PD-11/(E-३४४३३६) दि २८ मार्च, २०२२ कक्ष अधिकारी संगणक कक्ष, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडून सूचना पत्र क्र. संकीर्ण – २०२२/प्र.क्र. ५६/ सं.क. दि. १२ मे, २०२२ नुसार केंद्र आणि राज्य शासनाकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत धान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याचे आधार सिडींग तातडीने विहित मुदतीत करुन घेण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत.

          या सूचनानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांनी आधार क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. जे लाभार्थी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत            अन्नधान्याचा लाभ घेऊ इच्छितात परंतु त्यांच्याकडे आधार क्रमांक नाही अथवा अद्याप आधारसाठी नोंदणी केलेली नाही अशा लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या दि. २२ मार्च, २०२२ च्या अधिसुचनेनुसार आधार क्रमांक सादर करणेसाठी किंवा आधार नोंदणी करण्यासाठी दि. ३० जून, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जे लाभार्थी दिलेल्या मुदतीत आधार क्रमांक जमा करणार नाहीत त्यांचेसाठी शासन निर्देशानुसार नमुद कागदपत्रांची पडताळणी संबंधित शासकीय अधिकारी यांनी केल्यावरच अन्नधान्याचा लाभ अनुज्ञेय होईल. असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.

          यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत ज्या लभार्थ्यांनी अद्याप आधार क्रमांक सादर केले नाहीत. अशा लाभार्थ्याचे आधार सिडींग करण्याकरीता दि. २५ जुन, २०२२ पर्यंत आधार क्रमांक सादर करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. या लाभार्थ्यांनी संबंधित रास्त भाव दुकानदार यांचेकडे आधार क्रमांक सादर करावेत. लाभार्थ्यांनी आधार क्रमांक सादर केल्यवर त्वरीत संकलित करण्याच्या सूचना सर्व रास्त भाव दुकानदार यांना देण्यात आल्या आहेत.

          तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आधार क्रमांक सादर केलेले नाहीत अशा लाभार्थ्यांनी दिनांक २५ जुन, २०२२ पर्यंत आपले आधार क्रमांक जमा करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.  असे जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव सुनिल सुर्यवंशी यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र 31 मे पर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन

Next Post

‘स्मार्ट’ प्रकल्पातून ग्रामीण क्षेत्राच्या परिवर्तनाची नांदी

Next Post
रमाई घरकूल योजनेसाठी तालुका निहाय प्रस्तावांना मंजुरी;समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांची माहिती

‘स्मार्ट’ प्रकल्पातून ग्रामीण क्षेत्राच्या परिवर्तनाची नांदी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo