Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘ध्यानी मनी विश्वकोश’ विषयावर प्रसिध्द लेखिका डॉ. विजया वाड यांचे व्याख्यान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/03/2021
in राष्ट्रीय
Reading Time: 2 mins read

दिल्ली,दि. २२ :प्रसिध्द लेखिका तथा महाराष्ट्र राज्य मराठी  विश्वकोश मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. विजया वाड यामहाराष्ट्रपरिचय केंद्राच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत’ २३ मार्च २०२१ रोजी ‘ध्यानी मनी विश्वकोश’ या विषयावर पाचवे पुष्प गुंफणार आहेत.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आली आहे. २३ मार्च रोजी  व्याख्यानमालेच्या पाचव्या दिवशी  डॉ. विजया वाड या दुपारी  ४ वाजता आपले विचार मांडणार आहेत.

डॉ. विजया वाड यांच्याविषयी

डॉ. विजया वाड यांची एकूण १५२ पुस्तके प्रकाशित असून त्यात २५ कादंबऱ्या, ४० कथासंग्रह, ५ चरित्रे (इतरांची), ८० बाल पुस्तके व २ नाटकांचा समावेश आहे. त्यांच्या ‘बंडू बॉक्सर’, ‘‍टिंकू टिंकल’ या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य  पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी २००५ ते २०१५ या प्रदीर्घ कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष मंडळाच्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या दरम्यान त्यांनी एकूण ७ विश्वकोष खंडांचे प्रमुख संपादक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांच्याच कार्यकाळात मराठी विश्वकोषाचे संकेतस्थळ तयार होवून २६००० पृष्ठांचे २० खंड डिजिटल स्वरूपात वाचकांसाठी उपलब्ध झाले. या संकेतस्थळास महाराष्ट्र  राज्याचा ‘प्लॅटिनम’ पुरस्कार तर कॉम्प्युटर सोसायटीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

मराठी विश्वकोश सर्वांपर्यंत पोहचावा याकरिता त्यांनी महाराष्ट्र भर ग्रंथवाचन स्पर्धा घेतल्या, याची नोंद घेत कोलंबो विद्यापीठाने त्यांना डी.लीट. हा बहुमान दिला.

मंगळवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण

मंगळवार व 23 मार्च 2021 रोजी  दुपारी  4  वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल, फेसबुक आणि युट्यूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारित होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत  आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे  ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share   तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi  युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कोविड रुग्णालयातील समस्या सोडविण्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती

Next Post

बांभोरीत ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडीत सचिन बिऱ्हाडे यांना पोलीस संरक्षण मिळावे – ॲड.अभिजीत रंधे

Next Post
बांभोरीत ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडीत सचिन बिऱ्हाडे यांना पोलीस संरक्षण मिळावे – ॲड.अभिजीत रंधे

बांभोरीत ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडीत सचिन बिऱ्हाडे यांना पोलीस संरक्षण मिळावे - ॲड.अभिजीत रंधे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d