Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नक्षलग्रस्त भागातील मतदारांचा आदर्श शहरी मतदारांनी घ्यावा : देवेंद्र गावंडे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
नक्षलग्रस्त भागातील मतदारांचा आदर्श शहरी मतदारांनी घ्यावा : देवेंद्र गावंडे

वेबचर्चा संवाद व मतदार जनजागृती अभियान

नागपूर,दि.13  :  18-18 किलोमीटर अणवाणी चालत मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या नक्षलग्रस्त भागातील नागरिकांचा आदर्श शहरी मतदारांनी घ्यावा. मतदानाला विरोध असताना, जीवाचा धोका असताना, लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी मनापासून मतदान प्रक्रियेत सहभागी होणारे हे नागरिक खऱ्या अर्थाने लोकशाहीचे पाईक आहेत, असे प्रतिपादन नक्षल भागाचे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय, महा आयटी, माहिती केंद्र यांच्यामार्फत दर गुरुवारी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वेब चर्चा संवाद आयोजित करण्यात येते. 25 जानेवारीच्या राष्ट्रीय मतदान दिनाच्या औचित्याला लक्षात घेऊन या वेब चर्चा संवादात ‘स्वातंत्र्यत्तर भारत व ग्रामीण भागातील निवडणुकांचे बदलते स्वरूप’, हा विषय श्रोत्यांसाठी घेण्यात आला होता. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने विचारवंतांचे पॅनेल गठीत केले आहे. यामध्ये देवेंद्र गावंडे यांचा मार्गदर्शक म्हणून सहभाग आहे.

आज झालेल्या वेबचर्चा संवादात मार्गदर्शन करताना त्यांनी नक्षल भागात त्यांनी अनुभवलेल्या विविध निवडणुका, त्यामध्ये आलेल्या अनेक जीवघेण्या अनुभवांची माहिती दिली. मात्र तरीही लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील व नक्षली भागातील मतदार हिमतीने उत्साहाने व जबाबदारीने पुढे येत असल्याचे प्रतिपादन केले.

महानगरांमध्ये मतदानाचा दिवस सुट्टीचा दिवस म्हणून मतदान करण्याऐवजी सहलीला बाहेर पडणाऱ्या शहरी मतदारांनी गडचिरोली सारख्या जिल्ह्यात 18 ते 20 किलोमीटर पायी जाऊन मतदान करणाऱ्या मतदारांचा आदर्श घेतला पाहिजे. लोकशाही व्यवस्थेत अधिक सुविधांची भर नागरी लोकसंख्येला मिळाली आहे. मात्र बोटावर शाई लावली तर बोटे तोडून टाकू, बंदुकीच्या गोळ्या घालू, अश्या धमक्या दिल्यानंतरही कुटुंबकबिल्यासह मतदानासाठी जाणारा आदिवासी बांधव लोकशाही प्रक्रियेमध्ये उजवा ठरतो. आदर्श ठरतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. मतदान प्रक्रियेमध्ये नेहमी ग्रामीण भागात अधिक मतदान होते. लोकशाही व्यवस्थेतील हे सुंदर चित्र आहे. सुविधांचा अभाव, वाहनांचा तुटवडा, उमेदवार घरापर्यंत पोहोचू शकत नाही, मात्र फार उच्चविद्याविभूषित नसताना देखील ग्रामीण भागातील नागरिकांना कोणाला मतदान करायचे? का मतदान करायचे? याबाबतचे मार्गदर्शन करावे लागत नाही. आपला जीव धोक्यात घालून प्रसंगी जीवाचे बलिदान करून लोकशाहीसाठी शहीद झालेल्या नागरिकांची संख्या ग्रामीण नक्षली भागात अधिक आहे. खरेतर मतदानाला किती महत्त्व द्यावे, याचे सुंदर चित्र, उत्तम उदाहरण या भागातील नागरिकांनी निर्माण केलेले आहे. मात्र त्यांचे कर्तृत्व दुर्लक्षित राहिले आहे, अशी खंतही त्यांनी आपल्या निवेदनात केली. मतदान प्रक्रियेसाठी या नागरिकांनी केलेल्या बलिदानाच्या यशकथा पुढे आल्या पाहिजे. या नागरिकांनी लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आत्तापर्यंत केलेल्या प्रयत्नांची नोंद घेतली गेली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी आपल्या निवेदनात केले.

वेब चर्चा संवादासाठी आलेले देवेंद्र गावंडे यांचे स्वागत जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल, निवडणूक उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त महाराष्ट्र परिचय केंद्राचे विविध उपक्रम

Next Post

या… महिलांनाही मिळणार रेशन कार्ड

Next Post
या… महिलांनाही मिळणार रेशन कार्ड

या... महिलांनाही मिळणार रेशन कार्ड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo