Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नगरदेवळा गटात तितुर नदीवरील पुलासह साडेतेरा कोटींच्या विकासकामांचे आ. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/01/2022
in सामाजिक
Reading Time: 1 min read
नगरदेवळा गटात तितुर नदीवरील पुलासह साडेतेरा कोटींच्या विकासकामांचे आ. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन

भडगाव(वार्ताहर)- पाचोरा व भडगाव तालुक्याच्या सिमेवरून वाहणाऱ्या तितुर नदीवरील बाळद येथील पुल बांधकाम करणे, पाचोरा नगरदेवळा दरम्यान नाचनखेडा, बाळद, अंतुर्ली आदी ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण व दुरुस्ती करावयाच्या तब्बल साडेतेरा कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा परिषद गटनेते रावसाहेब पाटील व माजी जि प. उपाध्यक्ष प्रकाश सोमवंशी यांची उपस्थिती होती. मोठे व लहान बाळद गावातून वाहत गेलेल्या तितुर नदी मुळे दोघे थंडीला असलेल्या गावातील लोकांची गैरसोय होऊन वाहनधारकांसह सर्वानाच मोठ्या फेऱ्याने ये-जा करावी लागत होती.

यामुळे वेळोवेळी ग्रामस्थांनी तितुर नदीवर पुलाची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत आ.किशोर पाटील यांनी तब्बल ८०० लक्ष रुपयांच्या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलाचे तसेच, गाळण ते बाळद रस्त्याचे डांबरीकरण करणे ४६७ लक्ष, अंतुर्ली बाळद रास्ता सुधारणा व डांबरीकरण करणे १०४ लक्ष अश्या तब्बल साडेतेरा कोटी रुपयांच्या विकासकामांची मंजुरी मिळवत या विकास कामांचे भूमिपूजन केले.

तसेच जनतेतून मागणी असलेल्या नगरदेवळा स्टेशन ते नाचनखेडा कामाचे टेंडर अंतिम टप्प्यात असून लवकरच त्या कामाला सुरुवात होणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले. त्यावेळी उपजिल्हा प्रमुख अभय पाटील, सरपंच जोतीबाई सोमवंशी, मा.सभापती पंढरीनाथ पाटील, अंबादास सोमवंशी, यादवराव सोनवणे, प्रवीण ब्राम्हणे, वसंत जिभु पाटील, धर्मेंद्र पाटील, महेंद्र पाटील, पियुष राजपूत, तुळशीराम मोरे, संदीप पाटील, नगरसेवक शीतल सोमवंशी, भास्कर पाटील, नूर बेग मिर्झा, धनराज चौधरी, जितेंद्र परदेशी, स्वीय सहाययक राजेश पाटील, ठेकेदार मनोज पाटील, बांधकाम अभियंता दिपक पाटील यासह परिसरातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

कोविड बाधितांनी मदतीसाठी विभाग स्तरावरील ‘वॉर्ड वॉर रूम’ कडे संपर्क साधावा;बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

Next Post

आजपासून प्रिकॉशन डोसला सुरुवात कचरूलाल बोहरा यांनी घेतला तालुक्यातील प्रथम प्रिकॉशन डोस;दोन दिवसात करणार उद्दिष्ट पूर्ण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo