Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नगरपरीषद प्रशासन व अधिकाऱ्यांकंडुन मनमानी कारभाराची वाटचाल;अधिकाऱ्यांना पडलाय नैतिक व मुलभूत कर्तव्यांचा विसर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/11/2019
in माहितीचा अधिकार २००५
Reading Time: 1 min read
नगरपरीषद प्रशासन व अधिकाऱ्यांकंडुन मनमानी कारभाराची वाटचाल;अधिकाऱ्यांना पडलाय नैतिक व मुलभूत कर्तव्यांचा विसर
जनमाहिती अधिकारी यांनी दिलेले उत्तर

एरंडोल-(शैलेश चौधरी)-येथील नगरपालिका कायमच काहीना काही कारणाने चर्चेत राहीली असून शासकीय नियम धाब्यावर ठेवून व अंमलबजावणी बरोबरच आपली मुलभूत कर्तव्ये यांचा विसर येथील अधिकाऱ्यांना पडला आहे. तेरी भी चूप और मेरी भी चूप या तत्वाने येथील कारभार चालत असल्याचे निदर्शनास येत असते. बरोबरच भ्रष्टाचार व बेजबाबदारपणा बाबतीत येथील यंञणेने कमालिचा उच्चांक गाठला आहे, याबाबत अधिक असे कि काही दिवसांपूर्वी एरंडोल शहरातील तरूणाने दि. ०९/१०/ २०१९ रोजी केंद्रीय माहिती अधिकार अधिनीयम – २००५ अंतर्गत न्याय प्रयोजनार्थ एरंडोल नगरपालिका हद्दीतील फुले-आंबेडकर व्यापारी संकुलाचे पहील्या मजल्याचे बांधकामासंबंधी नकाशा सत्यांकित केलेली प्रत मिळावी म्हणून रीतशिर पध्दतीने आवेदन केले असता त्या आवेदनास जनमाहीती अधिकारी तथा अभियंता नगरपालिका एरंडोल यांचेकडून प्राप्त झालेले उत्तर कमालिचे तापदायक व बुचकळ्यात टाकणारे तसेच दिशाभुल करणारे आहे. असे असून कोणाचेही मालमत्तांचे बांधकाम परवानगी व नकाशे विषयक माहिती सार्वजनिक हीत असल्याशिवाय आपणास पुरविता येत नसल्याचे उत्तर नगरपालिका अभियंता तथा जनमाहीती अधिकारी यांचेकडून मिळाले आहे. नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभाराची प्रचीती याठिकाणी येत आहे. प्रकर्षाने जाणवणारी बाब म्हणजे ज्या बांधकामासंदर्भातील माहिती मागण्यात आलेली आहे ती कोण्या एकाची वास्तू/मालमत्ता नसून नगरपालिकेचेच व्यापारी संकुल असून बांधकाम परवानगी विषयी माहिती मागीतली नसून तसेच परवानगी घेणार्‍या व्यक्ती संदर्भातील नाही. असे असतांना मूळ विषयाला हेतूपुरस्कररित्या बगल देऊन बुचकळ्यात टाकणारी, संभ्रम निर्माण करणारी तसेच दिशाभूल करणारी उत्तरे देवून, कानावर हात ठेवून नगरपालिकेस काय साध्य करावयाचे आहे. असा प्रश्न या तरूणाखेरीज सर्वसामान्यांस पडत आहे. बरोबरच नैतिक व मुलभूत कर्तव्यांबाबत येथील प्रशासकीय अधिकारी किती जागृत आहेत हेही यावरून लक्षात येत आहे. यावर प्रथम अपिल दाखल करणार असल्याचे देखील तक्रारदार यांनी सांगितले आहे व वेळ आल्यास द्वितीय अपील देखील दाखल करणार असुन कायदेशीर लढा चालुच राहील असे ही त्यांनी सत्यमेव जयते च्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जि.प. शाळा गालापुर येथे मौलाना अबुल कलाम आझाद राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा

Next Post

डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती उत्साहात साजरी

Next Post
डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती उत्साहात साजरी

डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती उत्साहात साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo