Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नाशिक विभागीय भरारी पथकाची परराज्यातील अवैद्य मद्य तस्करी वाहतुक विरोधात कारवाई;एक कोटीपेक्षा अधिक रक्कमेचा मुद्देमाल जप्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read


जळगाव, (जिमाका) दि. 13 – निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक या पथकाने दिनांक 11 जुलै, 2021 रोजी एस.एस.चौधरी ढाब्याच्या बाजुला चाळीसगाव-औरंगाबाद रोडवर, बोढरे फाटयाजवळ, सांगवी शिवार, चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी वाहन तपासणी कामी सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेले तसेच गोवा राज्यनिर्मित व विक्रीकरिता असलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक यांनी दिली आहे.


त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून गुन्हा रजिस्टर क्रमांक 165/2021, दिनांक 11 जुलै, 2021 रोजी परराज्यातील विदेशी मद्य – रॉयल ब्ल्यु माल्ट व्हिस्की 180 मि.ली. क्षमतेच्या 60480 बाटल्या (1260 बॉक्स). इतर साहित्य- मद्यसाठा ठेवण्याकरिता बनवलेले 6 प्लायवुडचे बॉक्स. एक सॅमसंग कंपनीचा एन्ड्रॉइड मोबाइल व एक सॅमसंग कंपनीचा साधा मोबाइल गुन्हयाकामी वापरण्यात आलेला आहे. 2 ताडपत्री. वाहन – टाटा मोटर्स लिमीटेट कंपनी निर्मित मॉडेल क्रमांक एलपीटी 3118 टीसी 8X2 बी.एस.3 बारा चाकी ट्रक जिचा प्रादेशिक परिवहन क्रमांक MP-09-HG-9354. जप्त मुद्येमालाची किंमत 1 कोटी 3 लाख 1 हजार 200 इतकी एवढी आहे. आरोपीचे नांव- अजय कन्हैयालाल यादव, वय-41 वर्षे, राहणार 45/8 जवाहर मार्ग, प्रेमसुख सिनेमाजवळ, इंदौर, मध्य प्रदेश-452007 असे आहे.
या पथक मोहिमेत कांतीलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई. श्रीमती उषा वर्मा, संचालक (अं.व.द.) महाराष्ट्र राज्य, मुंबई. अर्जुन ओहोळ, विभागीय उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक. श्रीमती सिमा झांबरे, अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथक मोहिम राबविण्यात आली.


ही कायर्वाही विभागीय भरारी पथकाचे निरिक्षक सी.एच.पाटील, दुय्यम निरिक्षक एस.एस.रावते, ए.डी.पाटील, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, युवराज रतवेकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या कार्यवाहीकरिता चाळीसगाव येथील निरिक्षक के.डी.पाटील, अमळनेर येथील दुय्यक निरिक्षक आर.पी.दांगट, मालेगाव येथील दुय्यक निरिक्षक आर.टी.खैरे, जवान महेंद्र बोरसे, अण्णा बाहिरम, संजय सोनवणे, शशिकांत पाटील यांनी मदत केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सी.एच.पाटील, निरिक्षक, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक हे करीत आहे.


अवैद्य मद्य निर्मीती, विक्री, वाहतुक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18008333333 व व्हॉटस् ॲप क्रमांक 8422001133 तसेच दुरध्वनी क्रमांक 0253-2319744 वर संपर्क साधावा. असे आवाहन निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रीय लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

Next Post

पाच वर्षाच्या आतील बालकांसाठी लसीकरण पाल ग्रामीण रुग्णालयात झाला शुभारंभ

Next Post
पाच वर्षाच्या आतील बालकांसाठी लसीकरण पाल ग्रामीण रुग्णालयात झाला शुभारंभ

पाच वर्षाच्या आतील बालकांसाठी लसीकरण पाल ग्रामीण रुग्णालयात झाला शुभारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo