Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निर्यातक्षम केळी उत्पादन हीच काळाची गरज -आ. चंद्रकांत दादा पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
निर्यातक्षम केळी उत्पादन हीच काळाची गरज -आ. चंद्रकांत दादा पाटील

मुक्ताईनगर – (प्रतिनिधी) – जिल्हा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषी विभाग मुक्ताईनगर यांच्याद्वारे मौजे उचंदा तालुका मुक्ताईनगर येथे तालुक्याचे आमदार माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निर्यातक्षम केळी उत्पादन व व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांचे प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करण्यात आले. सदर प्रशिक्षणात देसाई फ्रुट्स एक्सपोर्टर कंपनीतर्फे श्री गणेश राजपूत यांनी शेतकऱ्यांना निर्यातक्षम केळी उत्पादन व केळी निर्यात करिता असणारे निकष तसेच शेतकऱ्यांना निर्यातक्षम केळी उत्पादन घेताना घ्यावयाच्या काळजी व घड व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात उपस्थित चांगदेव मुक्ताईनगर येथील प्रगतिशील शेतकरी व केळी निर्यातदार श्री विनायक पाटील यांनी शेतकऱ्यांना बड इंजेक्शन व बँच स्प्रे बाबत प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री अभिनव माळी यांनी शेतकऱ्यांना फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करून फवारणी करताना घालायचे प्रोटेक्शन कीट चे महत्व सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी मुक्ताईनगर तालुक्यातून गुणवत्तापूर्ण केळी उत्पादन होऊन तालुक्‍यातील प्रत्येक गावातून केळी निर्यातदार निर्माण व्हावे असे मानस व्यक्त केले व कृषी विभागाच्या उपक्रमाचा त्यांनी कौतुक करत असे कार्यक्रम गावोगावी होतील व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण केळी उत्पादन करावे असे आवाहन केले.

त्यासाठी लागणारे प्रशिक्षण व मदत शासनामार्फत व कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात श्री विनोद तराड अध्यक्ष माफदा महाराष्ट्र राज्य , एडवोकेट भैय्यासाहेब पाटील, गावाचे सरपंच श्री शेषराव पाटील, मंडळ कृषी अधिकारी श्री नितीन पगार, तालुक्याचे बी टी यम श्री सैंदाणे तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक व उचंदा गावातील सर्व केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतीय राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण सैन्यातील जवान किंवा सेवानिवृत्त सैनिकांच्या हस्ते करण्यासाठी दिले निवेदन

Next Post

नेहरू युवा केंद्रकडून भूषण लाडवंजारी यांच्या तुळजाई फाउंडेशनला जिल्हा पुरस्कार प्रदान

Next Post
नेहरू युवा केंद्रकडून भूषण लाडवंजारी यांच्या तुळजाई फाउंडेशनला जिल्हा पुरस्कार प्रदान

नेहरू युवा केंद्रकडून भूषण लाडवंजारी यांच्या तुळजाई फाउंडेशनला जिल्हा पुरस्कार प्रदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo