Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मोफत केरोसीन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मोफत केरोसीन

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश

नवी मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित ७ लाख ६९ हजार ३३५ शिधापत्रिकाधारक रायगड वासियांना मोफत केरोसीन देण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला. जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

Maha Info Corona Website

अरबी समुद्रात तयार झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक भागात नुकसान झाले. वादळामुळे संपर्क यंत्रणा कोलमडल्या, वृक्ष उन्मळून पडले, वाहतुक विस्कळीत झाली. वादळाचा सर्वाधिक तडाखा अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या तालुक्यांना बसला. जिल्ह्यातील महावितरणाच्या विद्युत यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करण्याबाबत महावितरणला त्वरित आदेश देण्यात आले आहेत. मात्र मुळात अनेक ठिकाणी रस्ते खराब असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यास थोडा अवधी लागणार आहे. केरोसीन नसल्यामुळे येथील लोकांना घरामध्ये कंदिल, दिवे लावण्यासाठी अडचणी उद्भवत आहेत. यावर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र शासनाने  नैसर्गिक आपत्ती, मत्स्य व्यवसाय, धार्मिक समारंभ, यात्रा व मेळावे इत्यादी प्रयोजनांकरिता विनाअनुदानित दराचे केरोसिन राज्यास उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित ७ लाख ६९ हजार ३३५  शिधापत्रिकाधारक कुटुंबांना प्रतिशिधापत्रिका पाच लिटर केरोसिन वितरित करण्यासाठी विनाअनुदानित दराचे केरोसिन नियतन मंजूर करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना प्रतिबंधासोबतच मान्सूनपूर्व उपाययोजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही : विजय वडेट्टीवार

Next Post

जिल्ह्यात आज ५६ कोरोना बाधित रूग्ण आढळले;संख्या ११६५ इतकी झाली

Next Post
आज दिवसभरात ६३ कोरोना बाधित रुग्ण आढळले

जिल्ह्यात आज ५६ कोरोना बाधित रूग्ण आढळले;संख्या ११६५ इतकी झाली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo