Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

नाशिक, दि.4 (जिमाका वृत्तसेवा):- निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील विविध भागात मोठा फटका बसला आहे. याचा फटका नाशिक जिल्ह्यालादेखील बसला असून आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी  येवला तालुक्यात नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना शासनाकडून लवकरच मदत दिली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Maha Info Corona Website

निसर्ग चक्रीवादळामुळे अंदरसुल आणि धामणगाव परिसरात नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर येवला तहसील कार्यालय येथे निसर्ग चक्रीवादळ नुकसान, खरीप आढावा व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री  छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी येवल्याचे प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, गटविकास अधिकारी उमेश देशमुख, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एच.आर. गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश पाटील, महावितरणचे उपकार्यकरी अधिकारी एम.पी.प्रजापती, उपविभागीय अभियंता एस.एम.देवरे, उपअभियंता स.प्र. राजपूत,तालुका कृषी अधिकारी के.ए. नवले,येवल्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, अनिल भवारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच येवला शहर व तालुक्यात असलेल्या कोरोना रुग्णांचा आढावा घेतला. त्यात संशयित रुग्ण, सद्यस्थितीत उपचार घेत असलेले अॅक्टिव्ह रुग्ण, बरे होऊन डिस्चार्ज मिळालेले रुग्ण , तपासणी अहवाल प्रलंबित असलेले रुग्ण, संस्थात्मक, होम क्वारंटाईन, कोरोना केअर सेंटर  व Dedicated Corona Health Centre (DCHC) च्या व्यवस्थापन बाबत आढावा घेतला.

त्याचबरोबर येवला तालुक्यातील खरीप हंगामाबाबत आढावा घेऊन त्याची सद्यस्थिती शेतकऱ्यांना देण्यात येणारे पीककर्ज वाटप,बियाणांची उपलब्धता व पुरवठ्याबाबत नियोजन, खतांची उपलब्धता व पुरवठा या बाबत नियोजन, सिंचनासाठी पाणी आरक्षणाचे नियोजन याचा आढावा घेऊन येवल्यातील पाणीटंचाईबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा, ३८ गाव व ४१ गाव पाणी पुरवठा योजनांची माहिती घेत वीज पुरवठा व ट्रान्सफॉर्मर बाबत अडचणी जाणून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

शिवभोजन केंद्र व येवला पोलीस स्टेशनच्या बांधकामाची पाहणी

पालकमंत्री  छगन भुजबळ यांनी निसर्ग चक्रीवादळ नुकसानीची पाहणी व त्यानंतर आढावा बैठक घेऊन अचानकपणे येवला शहरातील संजीवनी मजूर सहकारी संस्था संचलित शिवभोजन केंद्रास भेट दिली. तसेच येवला प्रशासकीय संकुलात पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अमरावतीत अडकलेल्या के. मंजुळा अखेर स्वजिल्ह्यात पोहोचल्या

Next Post

राज्यात ४१ हजार ३९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज १३ कोरोना बाधित रूग्ण आढळले

राज्यात ४१ हजार ३९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo