Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्राचा उपक्रम, अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
नेहरू युवा केंद्राचा उपक्रम, अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे!

जळगाव, दि.२१ – संपूर्ण जगात दि.२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे मंगळवारी माहेश्वरी विद्या प्रसारक संस्थेच्या अभिनव विद्यालयात साजरा करण्यात आला. योग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. योगा दिनाचा उपक्रम नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे मंगळवारी माहेश्वरी विद्या प्रसारक संस्थेच्या अभिनव प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून योगाबाबत जनजागृती करण्यात आली. योगशिक्षक जितेंद्र कोतवाल यांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. प्रसंगी अभिनव शाळेचे मुख्याध्यापक हेमंत पाटील, मुख्याध्यापिका सरोज तिवारी, नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेविका हेतल पाटील आदी उपस्थित होते. उपक्रमात ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

योगशिक्षक जितेंद्र कोतवाल यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून देत आजच्या दिवसाचे महत्व सांगितले. मुख्याध्यापक हेमंत पाटील व सरोज तिवारी यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. योगाचे विविध प्रकार विद्यार्थ्यांनी समजून घेतले. उपक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक साधना कोल्हे, वैशाली पाटील, नयना मोरे, दीप्ती नारखेडे, प्रेमसिंग चव्हाण, साजन तडवी, उज्ज्वला पवार, शिल्पा रौतोळे, वर्षा गवळी, पंकज पाटील, अश्विनी साळुंखे, ज्योती पाटील, संतोष सपकाळे, गुरु बारेला शिक्षकेतर कर्मचारी देविदास चौधरी, भूषण पाठक, लताबाई माळी, अमिना तडवी आदींनी सहभाग नोंदवित परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात “आंतरराष्ट्रीय योग दिन” उत्साहात संपन्न

Next Post

रेडक्रॉस भवन येथे ओ.पी.डी. रुग्णसेवा (बाह्यरूग्ण विभाग) सुरु

Next Post

रेडक्रॉस भवन येथे ओ.पी.डी. रुग्णसेवा (बाह्यरूग्ण विभाग) सुरु

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo