Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिकांची दाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
नेहरू युवा केंद्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिकांची दाद

जळगाव – (प्रतिनिधी) – २ डिसेंबर २०२१ । केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शहरातील विविध गटाकडून सांस्कृतिक नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित स्पर्धक, रसिकांनी भरभरून दाद दिली.

नेहरू युवा केंद्र जळगाव आणि मू.जे.महाविद्यालय नृत्यकला विभागाच्या संयुक्त विद्यमाने आणि दिशा समाज प्रबोधन बहुद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दि.२ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य संजयभारंबे होते. व्यासपीठावर के.सी.ई.चे. प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एल.पी.देशमुख, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या उपस्थिती दीपप्रज्वलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या निर्बंधामुळे कार्यक्रमाचे आयोजन छोटेखानीच करण्यात आले होते. कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्य जत्राचे कलाकार प्रा.हेमंत पाटील, हलगी सम्राट नाटकाचेचे दिग्दर्शक हनुमंत सुरवसे यांना मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच प्रभाकर संगीत कला अकादमीचा चमू, नृत्य कला विभाग प्रमुख अजय शिंदे, अमोल ठाकूर गुजराथी यांच्यासह सर्व संघांचा सन्मान करण्यात आला.

अध्यक्ष प्राचार्य भारंबे यांनी, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त नेहरू युवा केंद्र विविध उपक्रम राबवित आहे. युवा वर्गाच्या मनात राष्ट्रभक्तीचे बीज रोवण्याचा प्रयत्न नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून केले जाते. आपल्यातील कला जोपासण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक करताना नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर म्हणाले, युवक देशाचे भविष्य आहे. आपल्या स्थानिक सांस्कृतिक कलेला वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सर्वांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन डागर यांनी केले.

कार्यक्रमात सहभागी संघांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले. सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले. कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे कोषागार अधिकारी अजिंक्य गवळी, स्वयंसेवक तेजस पाटील, दुर्गेश आंबेकर, हेतल पाटील, शुभांगी फासे, रवींद्र बोरसे, मनोज पाटील, मुकेश भालेराव, नेहा पवार, रोहन अवचारे, कल्पना पाटील, सुश्मिता भालेराव, किरण मेढे यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“शावैम” मध्ये स्वच्छता अभियान ; आजपासून सुरू होणार जनसंपर्क कक्ष

Next Post

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा

Next Post
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo