Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोबल इंटरनॅशनल स्कूल येथे “स्पोर्ट्स डे” मोठ्या उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

पाळधी/जळगांव(प्रतिनीधी)- सुर्या फाऊंडेशन संचलित नोबल इंटरनॅशनल स्कूलचा स्पोर्ट्स डे मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख अतिथी तसेच उद्घाटक म्हणून आशिष कासट उपस्थित होते. टायर रोलींग करुन त्यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या वेळी शाळेच्या संचालिका सौ अर्चना सुर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी उपस्थित होते. नंतर मुलांना सर्व कालबाह्य झालेले तसेच मैदानी खेळ खेळवण्यात आले. यामध्ये लंगडी, कबड्डी, खो-खो, लगोरी, गोट्या, टायर रोलींग, मामाचे पत्र हरवले हे खेळ तसेच मुलींसाठी मातीचे भांडे बनवून भातुकलीचा खेळ खेळवण्यात आले. हे खेळ खेळताना मुलांमध्ये उत्साह दिसून आला. यावेळी आशिष कासट यांनी मुलांना खेळामधे करीयर करण्याच्या अनेक संधी विशद करुन त्यासाठी पुर्वतयारी कशी करावी, योग्य व्यायाम व आहार तसेच योग्य मार्गदर्शन कसे मिळवावे याविषयाचे मार्गदर्शन केले. तसेच मुलींनी प्रामुख्याने सध्याच्या सामाजिक स्थितीमधे वावरताना काय काळजी घ्यावी याचेही त्यांनी मार्गदर्शन केले. नंतर शाळेचे अध्यक्ष प्रशांत सुर्यवंशी यांनी आपले जुने खेळ किती आरोग्यदायी होते यावर मार्गदर्शन केले. यावेळी पाळधी गावातील सरपंच चंदू माळी, शाळेचे मुख्याध्यापक योगेश करंदीकर यांच्यासह उज्वला झंवर,  राधिका उपाध्याय, विजया मोरे, गुणवंत पवार, सतीश पाटिल, अश्विनी ठाकरे हे उपस्थित होते तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लोखंडी यात्रेला दुचाकीने जातांना मांजाने गळा चिरल्याने ८ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

श्री अग्रवाल नवयुवक मंडळातर्फे 12 जानेवारी रोजी खान्देशस्तरीय अग्रवाल समाजाचा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

Next Post
श्री अग्रवाल नवयुवक मंडळातर्फे 12 जानेवारी रोजी खान्देशस्तरीय अग्रवाल समाजाचा  वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

श्री अग्रवाल नवयुवक मंडळातर्फे 12 जानेवारी रोजी खान्देशस्तरीय अग्रवाल समाजाचा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo