Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

न्यायालयाचा दणका;घरकुल घोटाळा प्रकरणी सर्वच दोषी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/08/2019
in राजकारण, विशेष
Reading Time: 1 min read

गुलाबराव देवकर व सुरेश जैन यांच्यासह सर्व सहकारी दोषीचंं

जळगाव – राज्यभर गाजलेला जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळ्यात ४८ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. धुळे जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवलेल्यांमध्ये माजी मंत्री सुरेश जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह सर्वच आरोपींना दोषी ठरवलं आहे. सोबतच सर्व संशयितांना ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आज सुनावणी दरम्यान विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी कोर्टात म्हंटले कि, घरकुल घोटाळ्यामुळे जळगाव महापालिकेवर कोट्यवधींचे कर्ज झाले आहे. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून त्या जळगाव शहर, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. निकालाच्या वेळी धुळे न्यायालयात मोठी गर्दी झाली. तसेच कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता.

नेमके काय आहे प्रकरण?

जळगाव नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी घरकुल योजना राबवण्याचे ठरवले होते. घरकुल बांधण्यासाठी “हुडको” कडून कोट्यवधींचं कर्ज घेण्यात आलं होते. हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा याठिकाणी कर्ज काढून ११ हजार घरे बांधण्याच्या कामास १९९९ मध्ये सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहार या सर्वांचा ससेमिरा मागे लागला. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील खान्देश बिल्डर्सला हे काम दिलं. नियमबाह्य पद्धतीने ठेकेदाराला सुमारे २६ कोटी रुपये बिनव्याजी आगाऊ देण्यात आले. इतकेच नव्हे, तर ठेकेदारास विविध सुविधाही देण्यात आल्या होत्या. हा सगळा प्रकार २००१ मध्ये समोर आला होता.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम निकृष्ठ दर्जाचे

Next Post

नोबल स्कूल मध्ये “एक दिवस आजी-आजोबांसाठी” अनोखा उपक्रम साजरा

Next Post
नोबल स्कूल मध्ये “एक दिवस आजी-आजोबांसाठी” अनोखा उपक्रम साजरा

नोबल स्कूल मध्ये "एक दिवस आजी-आजोबांसाठी" अनोखा उपक्रम साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo