Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पगार न मिळाल्यास रुग्णवाहिका चालक आंदोलन करणार ‘हे’ अनोखं आंदोलन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/06/2023
in राज्य
Reading Time: 1 min read
पगार न मिळाल्यास रुग्णवाहिका चालक आंदोलन करणार ‘हे’ अनोखं आंदोलन

तीन ते चार महिन्यांपासून थकीत असलेले पुणे जिल्ह्यातील ९० कंत्राटी रुग्णवाहिका चालकांचे वेतन न मिळाल्यास येणाऱ्या पालखी सोहळ्यावर बहिष्कार टाकून आंदोलन करणार असल्याची माहिती कंत्राटी रुग्णवाहिका चालक संघटनेचे अध्यक्ष काळूराम माने यांनी दिली.चोवीस तास आरोग्य विभागात सतर्कपणे काम कंत्राटी रुग्णवाहिका चालक करत असतात, गरोदर मातांना ने आण करणे, अपघातग्रस्त, पोलिओ, मेडिसिन आणणे असे विविध कामे ते बजावत असतात.

राज्यभरातून वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात, आपत्कालीन दरम्यान वारकऱ्यांना जवळच्या रुग्णालयात पोहचविण्याचे काम रुग्णवाहिका चालक करत असतात. मात्र,प्रशासनाच्या व कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णवाहिका चालकांच्या घरावर उपासमारीची वेळ आली आहे. जेंव्हा पासुन निविदा प्रक्रिया झाली आहे तेंव्हा पासुन रुग्णवाहिका चालकांना पीएफ रक्कम मिळाली नाही. गेली तिन महिन्यांपासून वेतन थकीत आहे. विना वेतन वाहन चालकांनी कोणतेही काम कसे करावे.

उदा. पालखी पालखीच्या ड्युटी प्रशासनाने लावल्या आहेत. वेतन नसेल तर पालखीच्या ड्युटी कशा करायच्या अशी वारंवार विचारणा केली असता जिल्हा परिषदकडुन निधी मिळाल्याशिवाय वेतन देणार नसल्याचे सांगण्यात येते.आपल्या स्तरावरून नविन निविदा जाहीर केली परंतू,आपण मागिल निविदा धारकाने वाहन चालकांचे वेतन दिले कि, नाही याची चौकशी करायला हवी होती. असे आरोग्य जिल्हाधिकारी यांना रुग्णवाहिका चालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कंत्राटदाराने आमचे वेतन दिले नाही, तरी सुध्दा वाहन चालक २४ तास काम करित आहेत. मागिल दोन वर्षापासून मोबईल भत्ता प्रति महिना २००रू व प्रसुती २००रू प्रमाणे मिळाले नाहीत. ती रक्कम गतवर्षी वाहन चालकांना मिळावी.

गेली १७ वर्षापासुन ठेकेदारांकडून वाहन चालकांची पिळवणूक होत आहे. कमी वेतनात व वेळेवर न होणाऱ्या वेतनात वाहन चालकांनी परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा. महागाई वाढ झाली आहे.वाहन चालकांची पिळवणूक थांबवावी व आपण वाहन चालकांना न्याय मिळवून द्यावा व अशी विनंती आरोग्य जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

LLB उत्तीर्ण तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; 1 लाखांपेक्षा जास्त मिळणार पगार

Next Post

दहावी पास नंतर करियरचे ‘हे’ पर्याय जे देतात लाखांपर्यंत नोकरीची हमी

Next Post
दहावी पास नंतर करियरचे ‘हे’ पर्याय जे देतात लाखांपर्यंत नोकरीची हमी

दहावी पास नंतर करियरचे 'हे' पर्याय जे देतात लाखांपर्यंत नोकरीची हमी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo