Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पतीच्या निधनानंतर मित्राने जमीन बळकावली; समाजसेवकाच्या सल्ल्याने विष प्यायलं, धुळेच्या महिलेचा मृत्यू

Desk Team by Desk Team
30/03/2023
in विशेष
Reading Time: 1 min read
मंत्रालय

Mantralay Suicide News : आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही महिला वेगवेगळ्या ठिकाणच्या असताना एकाच कथित समाजसेवकाच्या संपर्कात होत्या. त्यानेच या दोन्ही महिलांना आत्महत्येच्या प्रयत्नाचा सल्ला दिला होता.

मुंबई : मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांपैकी एकीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शीतल गादेकर (धुळे) आणि संगिता ढवरे (नवी मुंबई) अशा दोन महिला काल मंत्रालयासमोर आल्या आणि त्यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना तत्काळ थांबवले. मात्र, काही प्रमाणात त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यामुळे दोघींनाही तत्काळ जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एका महिलेची प्राणज्योत आज मालवली आहे. शीतल गादेकर असं सदर महिलेचं नाव आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, चेहर्‍याला मास्क लावून आणि टॅक्सीत बसून शीतल गादेकर आणि संगिता ढवरे या दोघी सोमवारी मंत्रालयात आल्या होत्या. दोघीही वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. तरीही त्या एकाच कथित समाजसेवकाच्या संपर्कात होत्या. संगीता ढवरे या नवी मुंबईतून एका पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नी आहेत. सदर पोलीस कॉन्स्टेबलचा पाय एका शस्त्रक्रियेदरम्यान निकामी झाला. त्या डॉक्टरविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी त्याची मागणी होती. तर शीतल गादेकर या धुळ्यातील असून, त्यांच्या पतीच्या निधनानंतर, पतीच्या मित्राने जमीन बळकावली, याबाबत कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती. आज गादेकर यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या दोन्ही महिला वेगवेगळ्या ठिकाणच्या असताना एकाच कथित समाजसेवकाच्या संपर्कात होत्या. त्यानेच या दोन्ही महिलांना मंत्रालयासमोर जाऊन विषप्राशन करा, त्यानंतर तुमच्या मागण्या पूर्ण होतील, असा विचित्र सल्ला दिला होता. त्यामुळे पोलीस या कथित समाजसेवकाबद्दल अधिक माहिती घेत आहेत.

Desk Team

Previous Post

सेवावस्ती विभाग व रोटरी क्लब ऑफ सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने कांचन नगर भागात पौष्टिक नाश्ता स्पर्धेचे आयोजन.

Next Post

वेडात मराठे वीर दौडले सातच्या चित्रीकरणावेळी दरीत कोसळलेल्या युवकाचा मृत्यू,उपचार खर्चावरुन वाद

Next Post

वेडात मराठे वीर दौडले सातच्या चित्रीकरणावेळी दरीत कोसळलेल्या युवकाचा मृत्यू,उपचार खर्चावरुन वाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo