Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पत्रकार महेंद्र सूर्यवंशी यांना जीवे ठार मारण्याची धमकी;पोलिसात गुन्हा दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/02/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
पत्रकार महेंद्र सूर्यवंशी यांना जीवे ठार मारण्याची धमकी;पोलिसात गुन्हा दाखल

पुन्हा एकदा लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभास जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार चाळीसगाव येथे घडला आहे

चाळीसगाव – (प्रतिनिधी) – येथील पत्रकार महेंद्र सूर्यवंशी यांना लाकूडतस्करांनी जिवे मारण्याची धमकी व शिवीगाळ केल्याने दोघांवर पोलिसात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त आहे असे की…!

चाळीसगाव येथील पत्रकार महेंद्र तुकाराम सूर्यवंशी यांना रतन वडर (रा. वाघळी )व गणेश पंडित महाजन (रा. टाकळी प्र.चा) या दोघांनी दिनांक ३१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता शहरातील खरजई नाक्यावर अडवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून पत्रकार महिंद्र तुकाराम सूर्यवंशी सह शहरातील पत्रकार बांधवांनी वरील दोघांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला, ३१ जानेवारीला वनविभागाने लाकडाने भरलेला एक ट्रक पकडला होता ,त्यावर कारवाईदेखील करण्यात आली मात्र हा ट्रक तू फोन केल्याने पकडण्यात आला, असा आरोप वरील दोघांनी महेंद्र सूर्यवंशी यांच्यावर केला. आणि त्यांना मोबाईलवर देखील शिवीगाळ करत दमबाजी करून खरजई नाक्यावर येण्यास सांगितले या ठिकाणी ते आल्यानंतर समजूत काढण्या ऐवजी त्यांनी तुला ट्रॅक्टर खाली घेऊन ठार मारू तुझ्या प्रेताचा देखील तपास लागू देणार नाही. अशी धमकी दिली म्हणून पत्रकार संरक्षण कायद्याच्या योग्य त्या कलमान्वये वरील दोघांवर कारवाई करावी अशी मागणी महिंद्र सूर्यवंशी व शहरातील पत्रकार बांधवांनी लेखी तक्रार देऊन पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांच्याकडे केली होती, सदर मागणी (अर्जानुसार) तक्रारीनुसार वरील दोघांवर आयपीसी ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच्यातील मुख्य आरोपी गणेश पंडित महाजन हा टाकळी प्र.चा. ग्रामपंचायतीमध्ये व त्या परिसरात आपले पोलिसांकडे खूप वजन आहे . असे म्हणून गावात दहशत निर्माण करत असल्याचे आणि पोलिसांच्या नावाने कलेक्शन देखील करत असल्याचे बोलले जात आहे .यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी असे जिल्ह्यातील सर्वच पत्रकार संघटने तर्फे व सर्वच पत्रकार बांधवांतर्फे मागणी करण्यात येत आहे.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभास जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्यास पोलीस प्रशासन पुढील कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे…!

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिष्यवृत्ती 21-22 करिता 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ-मंत्री धनंजय मुंडे

Next Post

१ फेब्रुवारीपासून कोविड रोखण्यासाठी नवीन नियमावली लागू-काय सुरू काय बंद जाणून घ्या एका क्लिक वर…..

Next Post
१ फेब्रुवारीपासून कोविड रोखण्यासाठी नवीन नियमावली लागू-काय सुरू काय बंद जाणून घ्या एका क्लिक वर…..

१ फेब्रुवारीपासून कोविड रोखण्यासाठी नवीन नियमावली लागू-काय सुरू काय बंद जाणून घ्या एका क्लिक वर.....

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo