Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पत्रकार संघटनेने उच्च ध्येय्य समोर ठेवून काम करावे -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
लोकप्रतिनिधित्व ही जनसेवेकरिता मिळालेली उत्तम संधी – राज्यपाल

मुंबई(प्रतिनिधी)- पत्रकारांच्या व्यापक हितासाठी काम करताना पत्रकार संघटनांनी उच्च ध्येय्य समोर ठेवून मिशनरी स्पिरीटने काम करावे. पत्रकारांच्या समस्या शासनाकडे नेताना त्यांची अभ्यासपूर्ण मांडणी आणि सादरीकरण केल्यास त्यांची दखल घेणे भाग पडेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांनी स्थापन केलेल्या ‘व्हॉईस ऑफ मिडिया’ या राष्ट्रव्यापी संघटनेच्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे बुधवारी (दि. ८) करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, कोरोना काळात राज्यात अनेक पत्रकारांचे निधन झाले. मात्र नेमक्या किती पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला याबाबत अचूक माहिती एकत्रितपणे उपलब्ध असणे गरजेचे आहे. पत्रकार संघटनांनी पत्रकारांविषयी सर्व माहितीची योग्य नोंद घेऊन मृत पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी लढले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

पत्रकारितेत तंत्रज्ञानामुळे बदल होत आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकार संघटनांनी पत्रकारांच्या प्रशिक्षणासाठी व कौशल्य वर्धनासाठी काम करावे, अशी सूचनाही श्री.कोश्यारी यांनी यावेळी केली.‘व्हॉईस ऑफ मिडिया’चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी पत्रकार संघटना पत्रकारांचे आरोग्य, निवृत्त पत्रकारांना मदत, पत्रकारांचे प्रशिक्षण यांसाठी काम करणार असून आजवर १८ राज्यात संघटनेचे काम सुरु झाले असल्याचे सांगितले.

नवा काळच्या संपादिका जयश्री खाडिलकर पांडे, जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे सीईओ चंद्रमोहन पुप्पाला, साम टीव्हीचे संपादक प्रसन्न जोशी, संपादक आशुतोष पाटील, सोराचे संपादक नरेंद्र बोर्लेपवार, संपादक तुळशीदास भोईटे, प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, संपादक संतोष आंधळे, राजेंद्र थोरात आदी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

डोमगाव येथे कोविड लसीकरण संपन्न

Next Post

रोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे नेशन बिल्डर अ‍ॅवार्डने सुनीता सिमालेंचा गौरव

Next Post
रोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे नेशन बिल्डर अ‍ॅवार्डने सुनीता सिमालेंचा गौरव

रोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे नेशन बिल्डर अ‍ॅवार्डने सुनीता सिमालेंचा गौरव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo