Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘परिवर्तन’ जळगावचा नाट्य महोत्सव पुण्यात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
‘परिवर्तन’ जळगावचा नाट्य महोत्सव पुण्यात

जळगांव(प्रतिनीधी)- ‘परिवर्तन’ जळगाव यांच्या नाट्य व संगीत कलाकृतीचा तीन दिवसीय महोत्सव पुणे येथील ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’ व ‘नाटकघर’, पुणे  यांनी ज्योत्स्ना भोळे सभागृहात दिनांक २४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केला आहे. ‘परिवर्तन’ जळगाव या संस्थेने आपल्या परिवर्तनशील उपक्रमांनी जळगावच सांस्कृतिक विश्व समृद्ध केल आहे. ‘परिवर्तन’ निर्मित कलाकृती व कलावंत यांचे कार्यक्रम आता पुण्या, मुंबई येथे नियमित आयोजित केले जात आहेत. महोत्सव संस्कृती खान्देशामध्ये निर्माण करणाऱ्या ‘परिवर्तन’चा महोत्सव आता पुण्यात देखील होणार आहे.खान्देशा मधील संस्थेचा महोत्सव पुण्यात होतो आहे हे पहिल्यांदा घडत आहे . खान्देशामधील सांस्कृतिक क्षेत्राला बळ देणारी ही गोष्ट आहे.  पुण्यात ३ दिवस चालणाऱ्या या महोत्सवा मध्ये पहिल्या दिवशी २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘अरे संसार संसार’ हा बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. लेवागण बोली मधील बहिणाबाईची कविता खान्देशा मधील कलावंत आपल्या बोलिमधुन उलगडणार आहेत. संकल्पना विजय जैन यांची असून दिग्दर्शन सुदीप्ता सरकार यांचे आहे.  या कार्यक्रमात मंजूषा भिडे, सोनाली पाटील, श्रद्धा कुलकर्णी, हर्षदा कोल्हटकर, अक्षय गजभिये, भूषण गुरव, योगेश पाटिल, प्रतीक्षा जंगम, नयना पाटकर आणी शंभू पाटील हे कलावंत असणार आहेत. निर्मिती प्रमुख पुरुषोत्तम चौधरी आहेत. या प्रयोगनंतर ‘नली’ या हर्षल पाटील अभिनीत एकल नाट्याचा प्रयोग होणार आहे. लेखक श्रीकांत देशमुख, नाट्यरूपांतर शंभू पाटील, दिग्दर्शन योगेश पाटील यांचे आहे. दिनांक २५ नोव्हेंबर रोजी   सायंकाळी ७ वाजता शंभू पाटील लिखित व दिग्दर्शित ‘गांधी नाकारायचाय… पण कसा ?’ हे अभिवाचन नारायण बाविस्कर, मंजूषा भिडे, होरीलसिंग राजपूत, मंगेश कुलकर्णी, हर्षल पाटिल, विजय जैन सादर करणार आहेत. निर्मिती प्रमुख वसंत गायकवाड , विशाल कुलकर्णी आहेत. दिनांक २६ नोव्हेंबर रोजी ‘अमृता , साहिर , इमरोज’ हे दिर्घनाट्य होणार आहे . संकल्पना राहुल निंबालकर यांची तर दिग्दर्शन मंजूषा भिडे यांचे आहे. जयश्री पाटील, हर्षदा कोल्हटकर आणि शंभू पाटील हे कलावंत याच सादरीकरण करतील . निर्मिती प्रमुख अंजली पाटील व चंद्रकांत इंगळे आहेत. या महोत्सवाला पुणे येथील अतुल पेठे, शुभांगी दामले, गोपाळ नेवे, बाबूराव भोर, शिवाजी सरोदे, यांचे सहकार्य लाभत आहे. ‘गांधी नाकारायचाय…पण कसा ?’ या प्रयोगाला राष्ट्र सेवा दल , महाराष्ट्र अंनिस, सा. साधना, हरिजन सेवक संघ या संस्थाचे सहकार्य लाभत आहे.परिवर्तन जळगाव ही सांस्कृतीक व सामाजीक  संस्था आहे. या संस्थेचा महोत्सव पुण्यात होतो आहे. या संस्थेच्या या महोत्सवाचा पुण्यामधील रसीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अतुल पेठे व शुभांगी दामले यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विलास यशवंते यांनी दाखवले माणूसकीचे दर्शन,समयसूचकता दाखवून केले बेशुद्ध रुग्णाला दाखल व उपचार करुन कुटुंबियांकडे केले सुपूर्द

Next Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन(मासु) आयोजित “विद्यार्थी संवादला” उस्फूर्त प्रतिसाद

Next Post
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन(मासु) आयोजित “विद्यार्थी संवादला” उस्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन(मासु) आयोजित "विद्यार्थी संवादला" उस्फूर्त प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo