Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पर्यावरण पुरक गणेशमुर्ती कार्यशाळा उत्साहात; भारत विकास परिषद, समर्पण संस्था व पर्यावरण शाळेचा उपक्रम

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
पर्यावरण पुरक गणेशमुर्ती कार्यशाळा उत्साहात; भारत विकास परिषद, समर्पण संस्था व पर्यावरण शाळेचा उपक्रम

जळगाव(प्रतिनिधी)- येथील भारत विकास परिषद, समर्पण संस्था व पर्यावरण शाळेच्या सयुक्‍त विदयमाने पर्यावरण पुरक श्रीगणेश मुर्ती कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत १५० च्या वर बालक व महिला सहभागी झाल्या होत्या. कोल्हेनगर जवळ, वर्धमान हाईट समोर शिवकॉलनी मागील शारदाश्रम विदयालय येथे पार पडलेल्या या कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद मिळाला. फाईन आर्टीस्ट उल्हास सुतार, कलाशिक्षीका योगीनी साळुंखे या कार्यशाळेत प्रशिक्षण दिली. यावेळी शाळू माती आयोजकांतर्फे पुरवण्यात आली होती. अनेक महिला व बालकांसाठी हा पहिलाच अनुभव असल्याचे या वेळी सहभागीनी सांगितले भारत विकास परिषद जळगाव, समर्पण संस्था व पर्यावरण शाळा यांच्या वतीने आज शाडू मातीचा गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

1) गौरी तुषार तोतला:- माझा हा पहिलाच अनुभव होता, खुपच चागल्या प्रकारे शिकवण्यात आले, खुप खुप छान गणेश मूर्ती साकारण्यात आली, सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद

2)राधिका राजीव नारखेडे:- आजची कार्यशाळा खूप छान झाली. गणपती तयार करतांना मजा आली तसेच त्यातील अनेक बारकावे पण समजले.हा पहिलाच अनुभव पण खूप छान होता.शिवाय सगळ्यांबरोबर गणपती साकारतानां जो आनंद मिळाला तो अवर्णनीय होता.त्यासाठी, भा.वि.प. जळगाव शाखा,समर्पण संस्था व पर्यावरण शाळेचे मनापासून आभार

3)जान्हवी श्रीहर्ष खाडिलकर:- आजची कार्यशाळा खुप छान झाली. मातीत हात भरवले तेव्हा लहानपणाची आठवण झाली. सगळ्यांसोबत गणपती बनविण्याचा एक छान अनुभव होता. तसेच खुप बारकावे लक्षात आले. सर्व कला शिक्षकांनी खुप महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. शालेय शिक्षकांनी सुध्दा खुप मदत केली तसेच पर्यावरण शाळेने खुपच छान व्यवस्थापन केले होते.

4)ज्योती रवींद्र लड्ढा:- सर्व संयोजकांचे मन:पुर्वक आभार… भारत विकास परिषद जळगाव, समर्पण संस्था व पर्यावरण शाळा यांच्यावतीने आज शाडू मातीचा गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. माझा हा दुसरा अनुभव होता. मागील वर्षी पण मी घरी गणेश मूर्ती बनवली होती आज खूप चांगल्या प्रकारे शिकवण्यात आले, खुप खुप छान गणेश मूर्ती साकारण्यात आली, व सर्व मिळून गणेश मूर्ती बनविणे यात खूप आनंद वाटला.

5)सीमा प्रशांत महाजन:- भारत विकास परिषद जळगाव यांच्या वतीने शाडू मातीचे गणपती शिकवण्याचे प्रशिक्षण घेण्यात आले. आपल्या हाताने गणपती बनवणे हा एक खूपच छान अनुभव होता. खूप चांगल्या पद्धतीने शिकवण्यात आले. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मी तीन वर्ष झाले घरीच गणपती बनवत आहे पण आज कला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व सर्वांसोबत गणपती बनवण्याचा छान अनुभव आला सुतार सरांचे सोपे टेक्निक शिकायला मिळाले पर्यावरण शाळेत येतील सर्व शिक्षकांनी चांगल्या प्रकारे व्यवस्थापन ठेवले होते. हसत खेळत वातावरणामध्ये गणपती बनवण्यात आनंद वाटला.

प्रसंगी, प्रकल्प प्रमुख चेतना नन्नवरे, भा.वि.प अध्यक्ष उज्वल चौधरी, सचिव उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सदस्यांनी परीश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शिक्षक दिनी पालक बनले शिक्षक; प.वि. पाटील विद्यालयाचा उपक्रम

Next Post

गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा; विधायक कार्यावर भर देण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

Next Post
गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा; विधायक कार्यावर भर देण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा; विधायक कार्यावर भर देण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d