Sunday, March 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पश्चिम घाट जैव विविधता संरक्षणासंदर्भात वनमंत्र्यांची बैठक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
पश्चिम घाट जैव विविधता संरक्षणासंदर्भात वनमंत्र्यांची बैठक

राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांसोबत केली चर्चा

यवतमाळ : पश्चिम घाटाचे क्षेत्र हे गुजरात ते केरळ अशा सहा राज्यात विस्तारले आहे. यात आपल्या राज्यातील २१३३ गावांमध्ये १७३४० चौरस किलोमीटर क्षेत्र हे पर्यावरण संवेदनशील (इको सेन्सेटिव्ह) ठरविण्यात आले आहे. जैव विविधता संरक्षणासोबत विकासही महत्त्वाचा असल्यामुळे त्याचा परिणाम औद्योगिक वसाहत आणि खनीज क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) सुरेश गैरोला यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी यवतमाळचे मुख्य वनसरंक्षक आर.के. वानखेडे, जैव विविधता मंडळाच्या कल्पना टेमगिरे, उपवनसरंक्षक डॉ. भानुदास पिंगळे उपस्थित होते.

Maha Info Corona Website

केंद्रीय वनमंत्री तथा पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पश्चिम घाटाच्या जैवधितता जोपासण्यासंदर्भात तसेच पश्चिम घाट इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये समाविष्ट करण्याबाबत राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी चर्चा करणार आहे. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम ३ नुसार आणि पर्यावरण संरक्षण नियम १९८६ उपनियम ३ नुसार केंद्र शासनास असलेल्या अधिकारानुसार पश्चिम घाटाचे पर्यावरण संवेदशनशील क्षेत्राचा मसुदा जारी करण्यात आला आहे. त्यानुसार केंद्राने राज्याचे १७३४० चौ. किमी क्षेत्र अधिग्रहीत केले आहे. मात्र यातील २५७०.८८ चौ. किमी क्षेत्र वगळण्याबाबत राज्याने केंद्राला विनंती केली आहे. इको  सेन्सेटिव्ह झोन महत्त्वाचा असून त्यामुळे जैव विविधता वाचणार परंतु राज्याच्या विकासात बाधा येऊ नये म्हणून औद्योगिक वसाहत व खनीज क्षेत्र ज्या भागात आहे, असे क्षेत्र वगळण्याची राज्याची मागणी आहे.

केंद्राच्या अधिसुचनेनुसार महाराष्ट्राच्या  १३ जिल्ह्यातील  ५६ तालुक्यातील  २१३३ गावांचे १७३४० चौ. किमी क्षेत्राचा पश्चिम घाट संवेदशील क्षेत्रामध्ये समावेश केला आहे. या अधिसुचनेवर राज्य शासनाच्या काही हरकती असल्यास त्या कळविण्याबाबत केंद्र शासनाने राज्य शासनाला निर्देश दिले आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या पत्रान्वये  ३५८ गावे,  उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील अभिप्रायानुसार १७ गावे आणि खाण व खनिकर्म संचालनालय यांच्याकडून प्राप्त गावांच्या यादीनुसार १३ गावे असे एकूण ३८८ गावे वगळण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

विधानपरिषद निवडणुकीसाठी १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध

Next Post

नागरिकांनी घाबरून जाऊ नये – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

Next Post
नागरिकांनी घाबरून जाऊ नये – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

नागरिकांनी घाबरून जाऊ नये – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d