Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पांढऱ्या सोन्याच्या दरात चढ उतार सुरु, विदर्भाच्या कापूस पंढरीत तुरीच्या दरात तेजी, बाजारभावात मोठी वाढ

Desk Team by Desk Team
27/03/2023
in विशेष
Reading Time: 1 min read


Cotton and Tur Rate : कापसाच्या दरात अकोटच्या बाजार समितीत चढ उतार सुरु असून तुरीचे दर मात्र वाढत आहेत. तुरीच्या दरात वाढ सुरु असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

March 27,अकोला : आज विदर्भातील कापसाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल ७५ रुपयांनी कापसाच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे कापसाला प्रतिक्विंटल मागे ८ हजार २२५ रूपये इतका भाव आहे. परंतु, कापसाच्या दरात घसरण होत असतानाच अकोल्यात तुरीच्या भावात तेजी आली आहे. कालच्या तुलनेत अकोल्यात आज तुरीचे दर १०० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक वाढली आहे, आज तुरीचे भाव ८ हजार ८०० रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे पोहचले आहे. आगामी काही दिवसात तुरीचे दर ९ हजारांचा टप्पा गाठणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पश्चिम विदर्भातील कापूस चांगल्या दर्जाचा असून त्याचा लांब धागा निघतोय. त्यामुळ या कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. गेल्या वर्षी कापसाला १० हजारापासून ते १३ हजार रुपयापर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला होता. मात्र, यंदा हा कापूस दर अद्यापही ८ हजार पासून ८ हजार ४०० रुपयांवर स्थिरावला आहे. कापसाच्या दरात आणखी वाढ होईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी न आणता कापूस घरातच साठवून ठेवला आहे.

कापसाच्या दरात पुन्हा ७५ रुपयांनी घसरण

गेल्या दोन दिवसात कापसाच्या दरात सुधारणा होऊन वाढ होत असताना पुन्हा कापसाचे दर घसरायला लागले आहेत. अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी कापसाच्या दरात ५० रुपयांनी घसरण झाली. अन् कापसाला प्रतिक्विंटल मागे ७ हजार ७०० ते ८ हजार ३०० रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला होता. परंतु रविवारी बाजार बंद असल्याने आज सोमवारी पुन्हा कापसाच्या दरात ७५ रुपयांनी घसरण झाल्याने कापसाचे दर ७ हजार ६०० ते ८ हजार २२५ रूपयांवर आले आहेत तर आवक २ हजार ७० इतकी क्विंटल झाली आहे.

अकोल्यात १०० तर अकोटच्या बाजारात ४०० रुपयांनी तुरीचे भाव वाढले


सर्वचं बाजारात तुरीची आवक चांगली असून तुरीला चांगला भाव मिळतो आहे. सद्यस्थित कापसाला मिळत असलेल्या भावामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय, त्यात तुरीने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. कारण तुरीला मिळत असलेल्या भावामुळे शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे.

अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला शनिवारी ५ हजार ५०० पासून ८ हजार ७०० रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला होता. तर सरासरी भाव ८ हजार १०० रूपये इतका होता. या दराच्या तुलनेत आज १०० रुपयांनी वाढ झाली आहे. तुरीला आज क्विंटल मागे ५ हजार ५०० पासून ८ हजार ८०० रूपयांपर्यत भाव मिळाला आहे. तर सरासरी भाव ७ हजार ९०० रूपये मिळाला असून २ हजार ४१३ क्विंटल इतकी तूर खरेदी झाली आहे. दूसरीकं अकोटच्या बाजारात शनिवारच्या तुलनेत आज तुरीच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली आहे. तुरीला ७ हजार ७०० पासून ८ हजार ७२५ रूपयांपर्यत प्रतिक्विंटल मागे भाव मिळाला आहे. शनिवारी या बाजारात तुरीला ७ हजार ५०० पासून ८ हजार ३७५ रूपयांपर्यत प्रतिक्विंटल तुरीला भाव होता. त्यामुळ इथे तुरीच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली आहे.

Desk Team

Previous Post

मंदिरात सापडली २ हजार मेंढ्यांची मुंडकी; सगळी रांगेत मांडलेली; प्राचीन अवशेषांचं रहस्य काय?

Next Post

शासन निर्णय..! सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता

Next Post

शासन निर्णय..! सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo