Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पालकमंत्र्यांच्या हस्ते पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उद्घाटन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
पालकमंत्र्यांच्या हस्ते पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उद्घाटन

जळगाव(प्रतिनिधी)- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवार दि. ७ ऑक्टोबर रोजी ऑक्सिजनचे पीएसए जनरेशन प्लांटचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषिकेश येथे केलेले संबोधन ऑनलाईन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषिकेश येथे हवेतून निर्माण होणाऱ्या पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे दीपप्रज्वलन करून उदघाटन केले. त्यानंतर पंतप्रधान यांनी देशभरातील पीएसए प्लांट बसविल्या गेलेल्या रुग्णालयांना ऑनलाईन संबोधन केले. जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उदघाटन श्रीफळ फोडून व ऑक्सिजन मशीनची कळ दाबून करण्यात आले.

यावेळी आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे यांच्यासह प्रभारी अधिष्ठाता डॉ.किशोर इंगोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण, जिल्हा नियोजन समितीचे प्रतापराव पाटील, प्र. प्रशासकीय अधिकारी डॉ.जितेंद्र सुरवाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले उपस्थित होते.प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यानंतर ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, ऑक्सिजन जनरेशन प्लांट हा तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प रुग्णांच्या उपचारासाठी व बरे करण्यासाठी योगदान देईल यात शंका नाही, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.

प्रसंगी, महाविद्यालयाच्या आवारात उभारलेल्या पीएसए ऑक्सिजन प्लांटचे मान्यवरांनी पाहणी करीत कौतुक केले. प्रसंगी कार्यक्रमासाठी ऑक्सिजन प्लांटचे समन्वयक डॉ.संदीप पटेल, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, डॉ. विलास मालकर यांच्यासह डॉ. इम्रान तेली, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ.वैभव सोनार, डॉ.योगिता बावस्कर, डॉ.उमेश जाधव, असिस्टंट मेट्रेन आशा चिखलकर यांच्यासह अधिकारी दिलीप मोराणकर, राजेंद्र धाकड, संजय चौधरी, संजय पाथरूट, महेश गुंडाळे आदी अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

काय आहे हा प्लांट:- करोना संसर्ग आजाराच्या उद्रेक परिस्थितीत ऑक्सिजन रुग्णांच्या उपचारासाठी अत्यंत जीवरक्षक वायू ठरत आहे. जगभरात रुग्णांची संख्या वाढून त्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज वाढली. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनची जागेवरच निर्मिती व्हावी यासाठी पी एस ए ऑक्सिजन जनरेशन प्लांट ही संकल्पना निर्माण झाली.

सदर प्लांट द्वारे हवेतुनच ऑक्सिजनची जागेवर निर्मिती केली जाते. त्यामुळे लिक्विड ऑक्सिजन कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत नाही. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्लांट हा एक हजार लिटर प्रति मिनिट एवढा ऑक्सिजन निर्माण करू शकतो. दिवसाला साधारण १.८७ मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन निर्माण होईल. जो रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वाचा ठरेल. हा प्लांट पीएम केअर अंतर्गत डीआरडीओ व राज्य शासनाच्या मदतीने उभारण्यात आला आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

घटस्थापनेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक घेतले मुंबादेवीचे दर्शन

Next Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये नवरात्री निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम संपन्न‘‘

Next Post
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये नवरात्री निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम संपन्न‘‘

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये नवरात्री निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम संपन्न‘‘

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo