Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बँक खाते आधार संलग्न करून ईकेवासी करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/05/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बँक खाते आधार संलग्न करून ईकेवासी करण्याचे आवाहन

जळगाव, दिनांक 4 (वृत्तसेवा जिमाका) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ यापुढे आधार क्रमांकास जोडलेल्या बँक खात्यामध्येच जमा होणार आहे. लाभार्थ्याचे बँक खाते आधारशी संलग्न नसेल तर अशा लाभार्थ्यांना योजनेचा 14 वा हप्ता वितरणापूर्वी त्यांचे बँक खाते आधार संलग्न करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. बँक खाते आधार क्रमांकास संलग्न करणेसाठी लाभार्थ्यांनी व्यक्तीशः संबंधित बँकेत जाऊन स्वतःचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे. असे आवाहन रविंद्र भारदे, नोडल अधिकारी पीएम किसान योजना तथा निवासी उपजिल्हाधिकारी, जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

            ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही ईकेवायसी केलेली नसेल अशा पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ आपले ईकेवायसी प्रमाणीकरण पुर्ण करुन घ्यावे. पीएम किसान पोर्टलच्या https://pekisan.gov.in  या वेबसाईटवरील Farmer Corner मधील ईकेवायसी या टॅब मधून ओटीपीद्वारे स्वतः लाभार्थ्यांना मोफत करता येईल. तसेच लाभार्थ्यांना ग्राहक सेवा केंद्रावरुन (CSC) सुध्दा बायोमॅट्रिक पध्दतीने ईकेवायसी प्रमाणीकरण करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर बायोमेट्रिक पध्दतीने ईकेवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रमाणीकरण शुल्क रुपये 15/- निश्चित करण्यात आले आहे.

            तरी केंद्र शासनाकडून पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता वितरणापूर्वी आधारशी बँक खाते संलग्न करणे बाकी असलेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधारशी संलग्न करुन घ्यावे. तसेच ईकेवायसी न केलेल्या प्रलंबित लाभार्थ्यांनी त्वरीत आपले ईकेवायसी प्रमाणीकरुन करुन घ्यावे. असेही श्री. भारदे यांनी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नंदुरबार जिल्हा परिषदेत ४८८ रिक्त पदांसाठी होणार भरती

Next Post

माजी सैनिकांनी चौकीदार पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
माजी सैनिकांनी चौकीदार पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

माजी सैनिकांनी चौकीदार पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo