Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पोटातील अडीच किलोची गाठ काढून शस्त्रक्रियेद्वारे महिलेला जीवनदान; शावैम मधील डॉक्टरांचे यश

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
25/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
पोटातील अडीच किलोची गाठ काढून शस्त्रक्रियेद्वारे महिलेला जीवनदान; शावैम मधील डॉक्टरांचे यश

जळगाव(प्रतिनिधी)- शहरातील चाळीस वर्षीय महिलेला गर्भाशयातील गाठीमुळे जीव धोक्यात आल्याने अनेक रुग्णालयात उपचार नाकारण्यात आले. मात्र येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महिलेला दाखल करून घेत शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातील सुमारे अडीच किलोची गाठ काढण्यात वैद्यकीय पथकाला यश आले.

शहरातील चाळीस वर्षीय महिला सुरेखा मिस्त्री यांना पोटामध्ये दुखत असल्या कारणाने व पाळीच्या दरम्यान अतिरक्तस्त्राव होत असल्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला होता. अनेक खाजगी रुग्णालयांनी महिलेची परिस्थिती पाहून तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर महिलेच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागामध्ये २० सप्टेंबर रोजी दाखल केले.

यावेळी विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी महिलेची तपासणी केली. पोटात गर्भाशयाला मोठी गाठ होती. सर्व तपासण्या व सोनोग्राफी केल्यानंतर असे आढळून आले की, गर्भाशय मधील गाठ अडीच किलोची आहे. महिलेवर तातडीने २१ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया करून ही अडीच किलोची गाठ काढण्यात आली. आज शनिवार दि. २५ सप्टेंबर रोजी महिलेची प्रकृती स्थिर असून तिचा जीव वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे.

शस्त्रक्रिया करण्यासाठी स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. शितल ताटे, डॉ. कोमल तुपसागर, डॉ. चंदन महाजन, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. राजश्री येसगे, डॉ. विनेश पावरा, यांच्यासह भूलतज्ञ डॉ. संदिप पटेल, डॉ. काजल साळुंके, डॉ. स्वप्नील इंकणे, शस्त्रक्रिया गृहातील परिचारिका नीला जोशी, परिचारिका कीर्ती तळेले व इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Team Satymev Jayate

Previous Post

हृदयविकाराचा झटका आणि वेळीच उपचाराच्या जनजागृती प्रशिक्षणामुळे जीव वाचविण्यास मदत होईल -राज्यमंत्री आदिती तटकरे

Next Post

गर्भाशयातील गुंतागुंतीच्या अवघड शस्त्रक्रियेने महिलेचे वाचले प्राण; “शावैम” मधील स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र विभागाला मिळाले यश

Next Post
पोटातील अडीच किलोची गाठ काढून शस्त्रक्रियेद्वारे महिलेला जीवनदान; शावैम मधील डॉक्टरांचे यश

गर्भाशयातील गुंतागुंतीच्या अवघड शस्त्रक्रियेने महिलेचे वाचले प्राण; "शावैम" मधील स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र विभागाला मिळाले यश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo