Friday, October 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पोलीस बँडच्या तालावर कोरोना लढवय्यांना निरोप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
पोलीस बँडच्या तालावर कोरोना लढवय्यांना निरोप

????????????????????????????????????

रूजू झालेल्या नव्या पथकाचे स्वागत

अमरावती : कोविड रूग्णालयात अहोरात्र सेवा बजावणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी या कोरोना लढवय्यांना वाद्यवृंदाच्या तालावर निरोप देण्यात आला. हे पथक आता संस्थात्मक विलगीकरणात राहून काही काळानंतर पुन्हा नव्याने सेवेसाठी सज्ज होणार आहे. दरम्यान, कोविड रूग्णालयात रूजू झालेल्या नव्या पथकाचे स्वागतही करण्यात आले आहे.

Maha Info Corona Website

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी येथील सुपरस्पेशालिटी रूग्णालयात कोविड १९ विशेष रुग्णालय तयार करण्यात आले आहे. रुग्णांची देखभाल आणि उपचार करण्यासाठी या रुग्णालयात सुमारे १०० जणांचे पथक दिवसरात्र कार्यरत असते. डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी, तंत्रज्ञ, रुग्णवाहिका चालक आदींचा त्यात समावेश आहे. कोविड रूग्णालयात सेवा देण्यासाठी तीन टीम तयार करण्यात आल्या असून, दर १० दिवसांनी त्यांच्या ड्युटी बदलून त्यानंतर त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाते. असा संपूर्ण काळ ही मंडळी आपल्या घरापासून दूर असते.

तिसरी टीम आपली सेवा देऊन रवाना झाली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वतः उपस्थित राहून या टीमच्या सदस्यांना निरोप दिला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्यामसुंदर निकम व इतर आरोग्य अधिकारी हेही यावेळी उपस्थित होते.

यावेळी पोलीस बँड वाजवून या पथकाचा सन्मानदेखील करण्यात आला. वाद्यवृंदाच्या तालावर सर्वांनी टाळ्या वाजवून या कोरोना लढवय्यांचे मनोबल वाढविले. अत्यंत जोखमीतही अहोरात्र आपली सेवा बजावणाऱ्या या कोरोना लढवय्यांवर फुलांचा वर्षावही करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री.नवाल यांनी यावेळी सर्व कोरोना लढवय्यांशी संवादही साधला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता-श्रीमंत कोकाटे

Next Post

जळगाव जिल्ह्यातील पंचवीस कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

Next Post
एपीएमसी मार्केटमधील कोव्हीड 19 विशेष तपासणी शिबिराचा 4 हजारहून अधिक व्यापारी, कामगारांनी घेतला लाभ

जळगाव जिल्ह्यातील पंचवीस कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo