Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रगती विद्यामंदिरात कोविड-19 हस्तलिखित प्रकाशित

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/09/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प्रगती विद्यामंदिरात कोविड-19 हस्तलिखित प्रकाशित

जळगाव(प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांच्या कला कौशल्याना वाव मिळावा या दृष्टिकोनातून प्रत्येक वर्षी शाळेतर्फे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांमार्फत हस्तलिखित प्रकाशीत केले जाते. जेणे करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पदवी हा हेतू साध्य होतो. हाच दृष्टिकोन घेऊन प्रगती विद्यामंदिर शाळेने जरी शाळेत विद्यार्थी नाही तरी आपला वार्षिक उपक्रम मागे राहू नये या पार्श्वभूमीवर शिक्षकांमार्फत लिखित कोविड-19 या हस्तलिखिताचे प्रकाशन विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते करण्यात आले.

या हस्तलिखितात कोरोना या रोगाची लक्षणें, उपाय तसेच घेण्यात येणारी खबरदारी, मनात असलेले विविध प्रश्न यांची उत्तरे हे स्पष्टीकरणात्मक देण्यात आलेली आहे. या हस्तलिखितात कोरोना या विषयी जनजागृतीचे काम करण्यात आले आहे. प्रकाशन सोहळ्याप्रसंगी विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल यांनी आपले मनोगत सांगताना ही भयावह परिस्थिती आहे यात आपल्याला एकजुटीने राहून या परिस्थितीचा सामना करायचा आहे व ही शैक्षणिक वाटचाल अशीच अवीरत चालवायची आहे हे सांगितले.

अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी उपक्रमाचे कौतुक करत शिक्षकांने उपक्रमशील राहणे ही या काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले. सचिव सचिन दुनाखे यांनी हस्तलिखिताला मार्गदर्शन करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा फेगडे यांचे कौतुक करत सर्व टीमचे अभिनंदन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

दाम्पत्याची आर्थिक फसवणूक; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

गौरव खाटीकला डॉ. सागर गरुड यांच्यावतीने एक लाख अकरा हजार रुपयांची मदत

Next Post
गौरव खाटीकला डॉ. सागर गरुड यांच्यावतीने एक लाख अकरा हजार रुपयांची मदत

गौरव खाटीकला डॉ. सागर गरुड यांच्यावतीने एक लाख अकरा हजार रुपयांची मदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo