Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रगती विद्यालयात बालदिनानिमित्त पारंपरिक खेळाने फुलविले विद्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावर हास्य

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/11/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प्रगती विद्यालयात बालदिनानिमित्त पारंपरिक खेळाने फुलविले विद्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावर हास्य

जळगांव(प्रतिनीधी)- विद्यावर्धिनी शिक्षण संस्था संचालित प्रगती विद्यामंदिर, प्रगती माध्यमिक, व प्रगती बालवाडी या शाळेत बालदिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. मुख्याद्यापक शोभा फेगडे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. याप्रसंगी  नवनीत तर्फे घेतलेल्या मास्टर स्ट्रोक चित्रकला स्पर्धेची बक्षीसे श्रीपाद भावसार, राशी ससाणे, राजेश कुंभार, भावेश शिरसाठ, मुकुंद सोनवणे, केदार चौधरी या विद्यार्थ्यांना देण्यात आली. बालविज्ञान परिषद मुंबई येथे विज्ञान प्रदर्शनाला जाणारे कौस्तुभ पवार व सर्वेश पाटील यांचे कौतुक करण्यात आले. जान्हवी पाटील, तेजस पवार, कौस्तुभ पवार, या विद्यार्थांनी चाचा नेहरू विषयी माहिती सांगितली. दिगंबर सोनवणे व सुयोग पाटील यांनी बालगीत सादर केले. संध्या अट्रावलकर यांनी नेहरूंच्या जीवनावर आधारित गोष्ट सांगितली. संध्या सरोदे या पालकांनीही आपली उपस्थिती देऊन एक बालगीत सादर केले. तसेच आपडी थापडी, हांडाफोड, माळीण माळीण, फुगडी, मामाचे पत्र, दोरी उड्या या सारखे पारंपरिक खेळ खेळून विद्यार्थाना या खेळाविषयी माहिती देऊन त्यांना या खेळांचा  मनसोक्त आनंद लुटू दिला. या प्रसंगी विद्यार्थाना खाऊ देण्यात आला. तसेच इ ८वी ते १० वी च्या विद्यार्थांनी म्हणी ओळखणे, कौन बनेगा सानपती,वैयक्तिक नृत्य, गीत हे कार्यक्रम घेण्यात आले. बालवाडी विभागाची डबा पार्टी आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी ज्योती कुलकर्णी, मनीषा पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश ससाणे सर व बारी सर तर आभार प्रदर्शन विजया पाटील यांनी मानले. चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल, अध्यक्षा मंगलाताई दुनाखे, सचिव सचिन दुनाखे, यांनी बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उद्योजकांची आढावा बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद,आमदार राजू मामा भोळे यांनी घेतले अधिकाऱ्यांना फैलावर;जळगाव एमआयडीसी अधिकाऱ्यांची झाडाझडती

Next Post

“राज्य नाट्य” स्पर्धेचा “पडदा” आज उघडणार

Next Post

"राज्य नाट्य" स्पर्धेचा "पडदा" आज उघडणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo