Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रताप माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
प्रताप माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

भडगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील प्रताप माध्यमिक विद्यालय(वडगाव सतीचे) याठिकाणी स्नेह मेळावा २०२१ एस.एस.सी वर्ग २००१/२००२ या बॅच चे आयोजन करण्यात आले होते. स्नेह मेळाव्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, गुरुजन वर्ग आणि माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

सदरील कार्यक्रमास दि शेंदुर्णी सेकंडरी एजुकेशन को.ऑफ सोसायटी लिमिटेड संस्थेचे संचालक सतीश काशीद, संचालिका उज्वला काशीद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे जेष्ठ संचालक यु.यु.पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. दिप प्रज्वलना नंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कारानंतर माजी विद्यार्थ्यांकडून आजी माजी शिक्षक यांना सन्मानित करून ऋननिर्देश दिले. यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आपल्या भावनाना वाट मोकळी करून आपले मनोगत व्यक्त केले. प्रत्येक माजी विद्यार्थ्यांने शाळेत आपली आठवण म्हणून शाळेच्या प्रांगणात वृक्ष लागवड केली. सदरील कार्यक्रमासाठी संस्थेचे संपर्क अधिकारी एस.के.राठी व शाळेचे मख्याध्यापक पी.एल. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वप्नील पाटील आणि सुजाता राठी यांनी केले. सदरील कार्यक्रमासाठी समाधान रोकडे व मनीषा पाटील व सर्वच माजी विद्यार्थ्यांचे अनमोल सहकार्य लाभले. सदरील कार्यक्रम पाहून सर्वच मान्यवर तसेच आजी माजी शिक्षक व मुख्याध्यापक यांनी आनंद व्यक्त केला.शेवटी वैशाली पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला.

Team Satymev Jayate

Previous Post

सुरज मोरेचे यश

Next Post

मृतांच्या नातेवाईकांना दोन दिवसांत मदत करुन, उच्चस्तरीय चौकशीचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याच्या आरोग्य मंत्रांच्या सूचना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo