Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेची रक्कम शेतकऱ्यांची खात्यावर हस्तांतरीत – कृषि आयुक्त धीरजकुमार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेची रक्कम शेतकऱ्यांची खात्यावर हस्तांतरीत – कृषि आयुक्त धीरजकुमार

जळगाव, (जिमाका) दि. 17 – प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना (PMKISAN) अंतर्गत देशातील 9.50 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्यातील (एप्रिल, 21 ते जुलै, 21) रूपये 19 हजार कोटीहून अधिक रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरणाचा कार्यक्रम दिल्ली येथून 14 मे, 2021 रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते ऑनलाइन पार पडला आहे.
हस्तांतरित केलेली रक्कम शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे सारख्या कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. माहे फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून देशातील 10 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना आत्तापर्यंत रूपये 1.15 लाख कोटीहून अधिक रकमेचा लाभ देण्यात आला आहे. असे धीरजकुमार, आयुक्त, कृषि, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र राज्यात या योजने अंतर्गत सुरुवातीपासून दिनांक 13 मे, 2021 अखेर 105.30 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण रु. 11 हजार 694 कोटी रकमेचा लाभ हस्तांतरित झाला आहे. तसेच 14 मे, 2021 रोजीच्या कार्यक्रमात दिनांक 1 एप्रील, 2021 ते दिनांक 31 जुलै, 2021 या कालावधीकरिता देय आठव्या हप्त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकुण 95.91 लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना साधारण रूपये 1 हजार 918 कोटीचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला गेला.
चालू वर्षी भारतीय हवामान विभागाने सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडण्याचे अनुमान जाहीर केले आहे. पाऊस वेळेवर सुरू होऊन जूनमध्ये पेरणीच्या दृष्टीने हा लाभ खरीप 2021 हंगामात विविध कृषी निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार असून यामुळे कृषी उत्पादन वाढीला चालना मिळणार असल्याचे धीरजकुमार, आयुक्त, कृषि तथा राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख पीएम किसान, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित बियाणे वितरणासह विविध घटकांसाठी शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

Next Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीबाबत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव शाखेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo