Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रा.डॉ.पद्माकर पाटील यांचा दणदणीत विजय

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/01/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
प्रा.डॉ.पद्माकर पाटील यांचा दणदणीत विजय

यावल-(प्रतिनिधी) – तालुक्यातील फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे पदार्थविज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. पद्माकर ज्ञानदेव पाटील यांनी कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या नुकत्याच झालेल्या प्राधिकरणाच्या निवडणुकीत अधिसभा सदस्य (सीनेट) पदी ओबीसी प्रवर्गातून प्रचंड मतांनी विजय मिळविला, त्याच प्रमाणे पदार्थविज्ञान या विषयाच्या अभ्यास मंडळावर निवडून आलेले डॉ.उदय जगताप व कॉम्प्युटर मॅनेजमेंटम या विषयाच्या अभ्यास मंडळावर बिनविरोध निवडून आलेले डॉ. रवी केसुर यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीषदादा चौधरी, प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी, यांनी बुके देवून सन्मान केला.

डॉ.ज्ञानदेव पाटील हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना (एनमुक्टो) चे अधिकृत उमेदवार होते या संघटनेतर्फे अकॅडमीक कौन्सिल साठी 5 आणि आधी सभेसाठी 10 असे एकूण 15 उमेदवार रिंगणात होते त्यापैकी एकूण 13 उमेदवार प्रचंड मतांच्या फरकाने निवडून आले, तसेच चित्र सर्वच अभ्यास मंडळांच्या सर्वच विषयात होते विरोधी मुक्ता संघटनेला याही ठिकाणी प्रचंड पराभव पत्करावा लागला एनमुक्टो आणि मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेच्या आघाडीने एकतर्फी विजय मिळवित आपले वर्चस्व कायम राखले आहे. यात विजयी उमेदवार डॉ. पद्माकर पाटील यांनी सांगितले की प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी यांनी या सर्व प्रक्रियेत केलेली मदत कधी ही न विसरण्यासारखी आहे तसेच आघाडीचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी या सर्वांनी जे सहकार्य केले ते पाहता या विजयाचे सर्व श्रेय अपना सर्व मंडळीना आहे म्हणून मी सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो असे मत या प्रसंगी डॉ. पद्माकर पाटील यांनी व्यक्त केले.

डॉ.केसूर व डॉ.जगताप यांनी ही भावना व्यक्त करत असताना सांगितले की पदाधिकाऱ्यांनी फॉर्म बाद होता कामा नये यासाठी बारकाईने सर्व गोष्टींची दक्षता घेतली व चुका दुरुस्त करून काळजीपूर्वक फॉर्म जमा केले म्हणून सर्वांचे आभार व्यक्त केले, कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.विजय सोनजे यांनी संघटनेची भूमिका मांडत असताना सांगितले की आज जो प्रचंड विजय मिळाला आहे त्याचे शिल्पकार संघटनेचे अध्यक्ष डॉ.अनिल पाटील हेच आहेत तसेच सोबत जीवाचे रान करून लढणारे सचिव डॉ.गौतम कुवर, खजिनदार प्रा.ई.जी.नेहते, जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ.किशोर कोल्हे, सचिव डॉ.ए.डी.गोस्वामी, धुळे जिल्हा अध्यक्ष डॉ.दिनेश पाटील, सचिव डॉ.संजय खैरनार, नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अधिकार बोरसे, सचिव डॉ. सुरेश पाटील, तसेच मागासर्गीय प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष.डॉ.जयवंत मगर,सचिव डॉ.अनिल हिवाळे,संस्थापक अध्यक्ष प्रा.बी.ए.संदानशिव,सचिव डॉ.डी.आर.तायडे, डॉ.शरद बिऱ्हाडे, दोन्ही संघटनेचे (आघाडीचे) तीन ही जिल्ह्यांचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य यांच्या सर्वांच्या परिश्रमाने हे यश मिळविता आले त्यांचा ही वाटा यात खूप मोठा आहे असे मत व्यक्त केले.


प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.पी. आर.चौधरी यांनी सरकारची दडपशाही ची भूमिका आणि त्याला न जुमानता प्राध्यापकांच्या हिताचे संरक्षण करणारी एकमेव संघटना फक्त एनमुक्टो हीच संघटना आहे ती पूर्वी ही तशीच होती आणि आज ही तशीच आहे या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो, परंतु काही मूठभर लोक व्यक्तिगत स्वार्थासाठी यातून वेगळे होतात आणि संघटनेत फूट पाडून सरकारचे मनसुभे पूर्ण करण्यासाठी वाट मोकळी करून देतात, त्यांच्या या चुकीच्या गोष्टीमुळे येणाऱ्या पिढीला भविष्यात खूप मोठे नुकसान सोसावे लागणार आहे, हे त्यांनी अजाच लक्ष्यात घ्यावे आणि वेळीच जागे व्हावे असे आवाहन केले, प्रसंगी अध्यक्षांचे स्वागत डॉ.ताराचंद सावसाकडे व डॉ.पंकज सोनावणे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्र संचालन व आभार प्रा.शिवाजी मगर, सचिव,स्थानिक शखा यांनी केले, सभेसाठी सर्व प्रद्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सीए परिक्षेत देशभरातून अनुभूती स्कूलची सौम्या जाजू २८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण

Next Post

वसंतवाडी येथे रमेश पाटील यांचा सत्कार

Next Post
वसंतवाडी येथे रमेश पाटील यांचा सत्कार

वसंतवाडी येथे रमेश पाटील यांचा सत्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d