Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण मिळावे; भा.ज.पा.ची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण मिळावे; भा.ज.पा.ची मागणी

विरोदा(किरण पाटिल)-  फैजपूर प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व वाहन चालक उमेश तळेकर यांच्यावर रावेर येथे तीन फळविक्रेत्यांनी हात उगारला होता. तिघांवर रावेर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. रावेर येथील झालेल्या घटणेचा जाहीर निषेध व पोलीस संरक्षण देण्याची मागणी फैजपूर भा.ज.पा. शहर अध्यक्ष अनंता नेहेते व त्यांच्या सहकार्यांनी फैजपूर येथील डी.वाय.एस.पी. कार्यालयात निवेदनाद्वारे केले आहे.

यावल-रावेर विभागाचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले व त्यांचे वाहन चालक उमेश तळेकर हे शासकीय सुट्टी, उन्हाळा, कोरोनाची भीती, कुटुंब याची कोणत्याही प्रकारची पर्वा न करता केवळ आपल्या उपविभागात  कोरोनाचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून पायाला भिंगरी लाऊन पूर्व- पश्चिम, चोरवड पासून ते चिंचोली पर्यंत आणि उत्तर-  दक्षिण, सातपुड्यापासून ते तापीच्या खोऱ्यापर्यंत दोन्ही तालुके पिंजून काढणाऱ्या एका प्रांजळ, कर्तव्यनिष्ट अधिकारी व त्यांचे वाहन चालक यांच्यावर रावेर येथे झालेल्या गैरवर्तणुकीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे.  दोन्ही तालुक्यात कोराना पसरू नये व या काळात गोर-गरीब  जनतेला जिवनावश्यक सेवा मिळाव्यात यासाठी कर्तव्य बजावित आहेत. अश्या अधिकाऱ्यांना खरोखरच सलाम केला पाहिजे. अश्या अधिकाऱ्यांवर अशी घटना घडणे ही अत्यंत खेदजनक आणि लज्जास्पद बाब आहे. प्राताधिकारी हे यावल-रावेर तालुक्यासाठी इंसीडेंट कमांडर व  सर्व प्रशासकीय यंत्रणाचे  प्रमुख म्हणून कामकाज करत आहे . सदर घटनेमुळे कर्मचारी आणि अधिकारी वर्गात असंतोष निर्माण होत आहे. फैजपूर प्राताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, असे निवेदन भा.ज.पा. फैजपूर  शहराध्यक्ष अनंता नेहेते, भा.ज.पा. शहर सरचिटणीस संजय सराफ, दिपक होले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत 125 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले

Next Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फैजपूर येथील मेढे परिवारा तर्फे अन्नदान

Next Post
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फैजपूर येथील मेढे परिवारा तर्फे अन्नदान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फैजपूर येथील मेढे परिवारा तर्फे अन्नदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo