Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बँकांनी कर्जपुरवठा करताना लघु उद्योजकांना प्राधान्य द्यावे- नरेंद्र पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) – बेरोजगारीवर मात करण्यासाठी बॅकांना समाजातील होतकरू तरुण, शेतकरी व लघु उद्योजकांना शासनाच्या विविध आर्थिक विकास महामंडळांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करतांना प्राधान्य द्यावेत. अशा सुचना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात आयोजित महामंडळाच्या योजनांच्या आढावा घेण्यासाठी अध्यक्ष श्री. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक संचालिका अनिसा तडवी जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अरूण प्रकाश, राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकांचे प्रतिनिधी, लाभार्थी आदि उपस्थित होते. अध्यक्ष नरेंद्र पाटील पुढे म्हणाले की, यापुढे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कर्ज प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत असल्याने लाभार्थ्यांना जिल्हा किंवा मुंबई येथे येण्याची आवश्यकता भासत नाही. लाभार्थ्यांनी आपले कर्ज प्रकरण सादर करताना त्या प्रकरणांना लागणारी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता केली आहे किंवा कसे याची खात्री करावी. लाक्षार्थ्यांसोबतच बँकानी ही प्रकरण सादर करून घेताना आवश्यक ती कागदपत्रे जोडले असल्याची खात्री करून घेवूनच प्रकरण सादर करून घ्यावे. जेणेकरुन त्या प्रस्तावांमध्ये काही त्रुटी असल्यास लाभार्थ्यांना त्याचवेळी सर्व व्यवस्थित समजावून सांगता येईल व त्यांच्याकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून घेऊनच प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठविता येईल. जेणेकरुन कर्ज मागणी प्रस्ताव मंजूरीस बँकानाही कोणताही अडथळा येणार नाही. शासनाच्या महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी   बँकांनी कर्ज मंजूरी पध्दत अधिक सुलभ करावी. लाभार्थ्यांनी सुध्दा कर्ज वेळेवर भरून बँकांना, शासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही श्री. पाटील यांनी केले. जिल्हा अग्रणी बँकेचे ‍व्यवस्थापक अरूण प्रकाश यांनी आढावा बैठकीस उपस्थित सर्व बँकांच्या प्रतिनिधींना मंडळांच्या कर्ज प्रकरणी अधिक लवचिकता बाळगावी आणि कोणताही लाभार्थी बँकांविषयी नाराजी व्यक्त करणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन विविध बँकांच्या प्रतिनिधींना केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

एरंडोल आठवडे बाजाराचे नियोजन शून्य ;विक्रेत्यांची दमछाक वाहतुकीचे तिनतेरा ;लोकप्रतिनिधींनीचे दुर्लक्ष

Next Post

राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर यांची पाचोरा-भडगांव भेट

Next Post

राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर यांची पाचोरा-भडगांव भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d