Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बचत गटांच्या यशकथा लिखाणाची स्पर्धा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
26/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
बचत गटांच्या यशकथा लिखाणाची स्पर्धा

मुंबई(प्रतिनिधी)- महिला बचत गटांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले असून त्या महिला उद्योग व्यवसायात उभ्या आहेत. या यशस्वी बचतगटांतील महिलांच्या यशकथा उत्तमरित्या लिहिल्या जाव्यात आणि त्याचे संकलन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने ‘कथा यशस्वीनींच्या’ ही राज्यस्तरीय यशकथा लिखाण स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

या स्पर्धेकरिता, महिला बचत गटाच्या सामुहिक प्रयत्नातून गावाच्या स्थितीत बदल, महिला बचत गटाकडून नाविन्यपूर्ण व्यवसायाची उभारणी, महिला बचत गटाच्या सामुहिक प्रयत्नातून सदस्यांचे समस्या निराकरण, स्वयंसहायता महिला बचत गटाचे यशस्वी आणि शाश्वत व्यवसाय,  महिला बचत गटामार्फत अन्नप्रक्रिया उद्योग, महिला बचत गटामार्फत शेतीपूरक उद्योग व्यवसाय, महिला बचत गटांची डिजिटल साक्षरता आणि त्याचा गटाच्या विकासासाठी उपयोग, महिला बचत गटांचा यशस्वी मत्स्यव्यवसाय, महिला बचत गटाची कोविड 19 प्रादुर्भाव काळातील अद्वितीय कामगिरी (मदत कार्य), महिला बचत गटाची कोविड 19 प्रादुर्भाव काळातील अद्वितीय कामगिरी (व्यवसाय/उद्योग), महिला बचत गटाच्या मदतीने गट सदस्य महिलांचे वैयक्तिक यशस्वी व्यवसाय/ उद्योग, DDUGKY अंतर्गत प्रशिक्षण घेऊन यशस्वीरीत्या रोजगारप्राप्ती आणि RSETI मधून प्रशिक्षित होऊन यशस्वी उद्योग व्यवसाय हे लिखाणाचे विषय आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदचे कर्मचारी किंवा महिला बचत गटाचे सदस्य असणे आवश्यक असून यशकथा मराठी भाषेत आणि युनिकोडमध्ये लिहिलेली असावी तसेच कमाल 750 शब्दमर्यादा असावी.

ही स्पर्धा जिल्हा आणि तालुका स्तरावरील कर्मचारी/व्यवस्थापक, समुदाय संसाधन व्यक्ती आणि गावस्तरावरील महिला बचत गटाचे सदस्य या तीन गटात होणार आहे. ही स्पर्धा दिनांक 10 नोव्हेंबरपर्यंत 2021 पर्यंत आहे.

या स्पर्धेतील विजेत्यांना राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक म्हणून रूपये 21 हजार आणि सन्मानपत्र, राज्यस्तरावर द्वितीय पारितोषिक रूपये 15 हजार आणि सन्मानचिन्ह, राज्यस्तरावर तृतीय पारितोषिक रूपये 11 हजार आणि सन्मानचिन्ह तसेच रूपये 2100 चे प्रत्येकी दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात येतील.

या स्पर्धेच्या संपूर्ण अटी व नियमावलीसाठी या अभियानाच्या राज्य कक्षात आणि जिल्हा कक्षात संपर्क करून या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनी केले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

रेल्वे प्रवासासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता दोन्ही लस अनिवार्य

Next Post

रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेवर भर द्या -नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Next Post
जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळतील याकडे लक्ष द्या -नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन

रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेवर भर द्या -नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo