Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बाजार समितीत भाजीपाल्याची किरकोळ विक्री करणाऱ्या पाच व्यापाऱ्यांचा परवाना निलंबित – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 3 – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात आपत्ती निवारण कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर देशात 21 दिवसांचा लॉकडाऊनही करण्यात आलेला आहे. या कालावधीत नागरीकांनी एकाच ठिकाणी गर्दी करु नये अशा सुचना शासनाच्यावतीने सर्वांना देण्यात आल्या आहेत.
जीवनावश्यक सेवा म्हणून या लॉकडाऊनमधून कृषि उत्पन्न बाजार समिती तसेच भाजीपाला विक्री करणे आदि बाबी वगळण्यात आल्या आहेत. असे असले तरी जीवनावश्यक वस्तुंची विक्री करतांना गदी होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. अशा सुचनाही सर्वाना जिल्हा प्रशासनाने दिल्यात आहेत. परंतु जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीतील काही घाऊक व्यापारी हे नागरीकांना किरकोळ स्वरुपातही भाजीपाला विक्री करीत होते. त्यामुळे बाजार समितीत नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. याबाबत या व्यापाऱ्यांना बाजार समिती प्रशासनाने वारंवार तसे न करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु त्यांनी या बाबींकडे दुर्लक्ष करुन गर्दीस कारणीभूत ठरल्यामुळे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी या व्यापाऱ्यांचा परवाना 14 एप्रिलपर्यत निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे प्रशासनाचे आदेश असताना त्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. ही बाबत प्रशासनाच्या लक्षात आल्याने आज सकाळी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी बाजार समितीस भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार कृषि उत्पन्न बाजार समितीमधील यार्डामध्ये हाजी रफीक ईसा बागवान, जोशी ब्रदर्स, प्रोप्रा सदाशिव वेडू जोशी, हबीब खाँ. समशेर खाँ., नाना पाटील अँङ कंपनी प्रोप्रा चंद्रकांत अशोक पाटील, गजानन ट्रेडिंग कंपनी प्रोप्रा आसाराम दामू बावस्कर या अडत्यांची (व्यापारी) परवाने निलंबित करण्यात आले आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन मध्ये विभागप्रमुख श्री. वासुदेव सोनू पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांची जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, याप्रसंगी पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांचेसह नोडल अधिकारी उपस्थित होते.
डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात सध्या इतर जिल्ह्यातून पायी येणाऱ्या नागरीकांची संख्या वाढली आहे. हे नागरीक जीथे असतील तीथेच त्यांना राहण्याची व इतर व्यवस्था करावी. तसेच जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आलेले आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजबावणी करा. जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थिती परदेशातून आलेल्या नागरीकांची स्क्रिनिंग करावे. अजूनही जिल्ह्यातील अनेक नागरीक स्थलांतर करीत असल्याचे निदर्शनास येत असल्याने चेकपोस्टवरील तपासणी कडक करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत दिल्यात.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात विनाकारण फिरणारी 142 वाहने पोलीसांकडून जप्त

Next Post

ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांच्या मदतीसाठी शालीग्राम लहासे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती

Next Post

ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांच्या मदतीसाठी शालीग्राम लहासे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d