Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘बियाणे स्वयंपूर्ण महाराष्ट्र’ या ध्येय्याने वाटचाल -कृषीमंत्री दादाजी भुसे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
विमा कंपन्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात -कृषिमंत्री

अकोला(जिमाका)- बियाण्यांच्या बाबतीत महाराष्ट्राची स्वयंपूर्णता व्हावी,हे ध्येय्य ठेवून राज्याचा कृषी विभाग नियोजन करून वाटचाल करीत आहे, अशी माहिती राज्याचे कृषी ,माजी सैनिक कल्याण मंत्री ना.दादाजी भुसे यांनी आज येथे दिली.कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज अकोला जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध योजना आढावा घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील समिती सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणेने शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचावे,असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

या बैठकीस विधान परिषद सदस्य आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.विप्लव बाजोरिया, आ.अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, विभागीय कृषी सह संचालक तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ.मुरली इंगळे तसेच सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी नियोजन सुरु असून जिल्ह्यात आवश्यक तितका बियाणे साठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात एक लाख २६ हजार ३८० हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे. जिल्ह्यात एकूण ७३ हजार १७४ क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात आवश्यक खतांचा साठाही असून मंजूर आवंटन ४४ हजार ६६० मे. टन आहे.

यावेळी ना.भुसे म्हणाले की, राज्याला बियाणे उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी महाबीज येथे सुद्धा आढावा घेण्यात आला. नगदी पिके, धान्य पिके, फळ पिके यासोबतच भाजीपाला पिकांची बियाण्यांबाबत राज्य स्वयंपूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषी विभागाच्या यंत्रणेने शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचावे. स्वर्गीय गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ देण्याबाबत आढावा घेतांना ना.भुसे यांनी वरील निर्देश दिले. शासनाच्या बियाणे अनुदान योजनेचा लाभ देण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांची नोंदणी करावी व गहू, हरभरा पिकांची बियाणे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात उपलब्ध करून द्यावीत,असेही त्यांनी निर्देश दिले.

पीक विमा योजनेत विमा कंपनीने नामंजूर केलेल्या प्रत्येक प्रकरणाचा आढावा घ्यावा, त्यातील त्रुट्या दूर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. पीक कापणी प्रयोग सुद्धा गांभीर्याने करावे, कापणी प्रयोग करतांना पिकातील कचरा, खराब माल, ओलसरपणा इ. बाबी वजावट कराव्या. ज्या शेतकरी कुटुंबातील कर्ती व्यक्ती कोरोनामुळे मयत झाली असेल अशा कुटुंबाला भेट देऊन त्यांना योजनांचा लाभ देऊन मदत देण्यात यावी. कृषी पर्यटन क्षेत्रात जिल्ह्याने स्थानिक कल्पना राबवून चालना द्यावी.

ना.भुसे यांनी संगीतले की, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आगाऊ नुकसान भरपाई २५ टक्के देण्याबाबत सहमती झाली असून दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल,याचे नियोजन विमा कंपनीने करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

Team Satymev Jayate

Previous Post

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Next Post

आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी तयारी पूर्ण, देखरेखीसाठी अधिकारी नियुक्त आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांची माहिती

Next Post
प्रवेशपत्राबरोबर ओळखपत्रही सोबत ठेवा -आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांचे उमेदवारांना आवाहन

आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी तयारी पूर्ण, देखरेखीसाठी अधिकारी नियुक्त आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांची माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo