बोदवड-( राजेंद्र शेळके) – शहरातील तहसील कार्यालयात संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने नायब तहसिलदार संध्या सुरेवंशी याना देण्यात आले.त्यामध्ये हर हर महादेव , वेडात मराठे विर दौडले सात” या चित्रपटांमधुन जानुन-बुजुन शिवइतिहासाची मोडतोड केली जात आहे.तसेच या चित्रपटांमधुन छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचा इतिहास जनमानसांत चुकीच्या पद्धतीने दाखवुन तमाम शिवभक्तांची मने दुखवली जात आहे. या चित्रपटांवर कायम स्वरुपी बंदी आणावी व चित्रपटाचे चित्रपटगृहात होणारे सर्व शो बंद करण्यात यावे अन्यथा संभाजी ब्रिगेड बोदवड तालुका आंदोलण करण्यात येईल.

यापासून होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील यासाठी दिनांक :-११/११/२०२२ वार – शुक्रवार रोजी दुपारी ठिक ०३ वाजता “तहसिल कार्यालय बोदवड यांचे माध्यमातून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना संभाजी ब्रिगेड व , शिवप्रेमी यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. प्रसंगी मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष अनिल पाटील, संभाजी ब्रिगेड चे शहर अध्यक्ष शैलेश वराडे,संघटक गणेश सोनोने, उपध्यक्ष गणेश मुलांडे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष दीपक खराटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निवृत्ती ढोले, सचिव प्रशात सुरडकर, वैभव माळी पवन पाटील, एड. ईश्वर पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजय वराडे, कॉग्रेस चे जिल्हा उपध्यक्ष सागर पाटील, यांच्या सह शिवप्रेमी उपस्थित होते .











