Monday, September 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘बोलवा विठ्ठल’ कार्यक्रमातून पांडुरंगाची अनुभूती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
‘बोलवा विठ्ठल’ कार्यक्रमातून पांडुरंगाची अनुभूती

जळगाव दि.१० प्रतिनिधी – विठ्ठल रूखमाईंच्या वेशभूषमधील चिमुकल्यांची दिंडी, रिंगण सोहळा, पाऊली, ताळ-मृदंगाचा गजर आणि ‘माझा देव पंढरी…’,’सुंदर ते ध्यान…’ या भक्ती गितांनी पंढरपूरच्या विठ्ठलाची आराधना करण्यात आली. ‘बोलवा विठ्ठल’ या कार्यक्रमाने पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शनाची अनुभूती जळगावात झाली.

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानतर्फे कांताई सभागृह येथे ‘बोलवा विठ्ठल’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वनाने झाली. याप्रसंगी स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, सीए विवेक काटदरे, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे प्रसाद भट, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद बुवा, प्रतिष्ठानचे सचिव अरविंद देशपांडे उपस्थित होते.

‘बोलवा विठ्ठल’ या कार्यक्रमात अनुभूती स्कूल, गोदावरी संगीत महाविद्यालय, शानबाग स्कूल, पलोड शाळा, विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक दीपिका चांदोरकर यांनी केले. गुरूवंदना वरून नेवे यांनी सादर केली. तेजल भट यांनी सूत्रसंचालन केले.

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडी, रिंगण व खेळ सादर केले. डॉ अपर्णा भट यांच्या प्रभाकर संगीत कला तर्फे नृत्याची प्रस्तुती करण्यात आले. यावेळी ‘गजर, घनू वाजे, कानडा राजा पंढरीचा, अनुभूती गणे, कोण्या गावी हो, माझा देव पंढरी, संतांची या गावी, खेळ मांडियेला, वेढा वेढा रे पंढरी, सुंदर ते ध्यान, चल ग सखे, रखुमाई रखुमाई अनुभूती, धाव घाली आई, विष्णू मय जग, अवघा रंग एक झाला, चंद्रभागेच्या तीरी, अवघे गरजे पंढरपूर’ अशी एकाहूनएक सरस भक्तीगितांची मैफल रंगली. भक्तिगीतांच्या मैफिलीतून साक्षात पंढरपूर अनुभूती रसिकांना झाली. तबला संगत प्रसन्न भुरे, सोहम कुलकर्णी तर हार्मोनियम साथ शौनक दीक्षित याने केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उमवी व महाविद्यालयीन  मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेचा जिल्हा स्तरीय मेळावा संपन्न

Next Post

शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post
शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळाव्याचे आयोजन

शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळाव्याचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo