Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.!आईच्या दुःखद निधनाची वार्ता कळल्यावर सुध्दा सत्यपाल महाराजांनी केले हजारोंचे प्रबोधन…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

राष्ट्रीय कीर्तनकार सप्तखंजेरीवादक प्रबोधनसम्राट सत्यपाल महाराज यांच्या आई श्रीमती सुशीलाबाई विश्वनाथ चिंचोळकर यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ९२ व्या वर्षी २१/फेब्रु/२०२० ला सायं ७:०० वाजता अकोट जिल्हा अकोला येथील जिजामाता चौक निवासस्थानी दुःखद निधन झाले.त्याच दिवशी सत्यपाल महाराज हे दुपारी ३:०० वाजता अकोट वरून वर्धा जिल्हात तरोडा या गावी कीर्तनाला गेले यावेळी कीर्तनाच्या गावात सायं ७:१० मिनिटांनी गेल्या बरोबर आपल्या आईच्या दुःखद निधनाची वार्ता मोबाईल द्वारा मुलगा डॉ.धर्मपाल यांनी महाराजांना दिली.पण आजचा जो महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम होता त्याची तारीख आयोजकांनी एक ते दीड वर्षा आधी महाराजांना मागितली होती आणि या जाहीर प्रबोधनाच्या कीर्तनाला दररोज सारखीच हजारोंची (२० हजार)उपस्थिती होती.इतका मोठा दुःखाचा डोंगर कोसल्यावर सुद्धा महाराजांनी स्वतःला सावरत आयोजक व उपस्थित हजारो मायबाप जनता जनार्धन यांचा सर्वस्व विचार करत मुलगा डॉ.धर्मपाल यांना मोबाईल वर संपर्क करून आई सुशीला यांचा मरणोत्तर नेत्रदान व देहदान हा प्रेरणादायी इच्छासंकल्प पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या व सांगितले मी इतक्या लवकर घरी पोहचू शकणार नाही तरी तुम्ही आईची मरणोत्तर नेत्रदान व देहदान ही इच्छा पूर्ण करावी.मी कीर्तनाचा कार्यक्रम करून निघतो.

या वेळी डॉ.धर्मपाल यांनी वडील सत्यपाल यांच्या सुचनेने पालन करत तुरंत रात्री ०८:३० वाजता आजीचे पार्थिव अकोला मेडिकल कॉलेज ला नेत्रदान व देहदानाकरिता अकोट वरून अकोला येथे नेण्याची तयारी केली. त्याआधी अंत्यदर्शनाकरिता रात्री ७:१५ ते ८:३० वाजेपर्यंत अकोट स्थित निवासस्थानी पार्थिव ठेवले होते. निसर्गवासी आई सुशीला यांचे पार्थिव अकोट वरून अकोला करिता निघाले व सत्यपाल महाराजांनी स्टेजवर प्रबोधनात्मक कीर्तनाला हजारोंच्या उपस्थितीत दररोज सारखी सुरवात केली.अकोला येथे मेडिकल कॉलेज ला रात्री १०:३० वाजता परिवारातील सदस्य तसेच शेकडो हितचिंतक मान्यवरांच्या उपस्थितीत निसर्गवासी आई सुशीला यांचे नेत्रदान व देहदान संपन्न झाले.तिकडे तरोडा जिल्हा वर्धा येथे सत्यपाल महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला.सप्तखंजेरीचा जादूगर प्रबोधनसम्राट ज्याचे पाळण्यातील नाव सत्यपाल ठेवणारी आई आज आपल्यातून निघून गेली..त्या मातोश्रीस भावपुर्ण आदरांजली.!

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी

Next Post

परिवर्तनच्या वेणुत्सवात ४५ बासरी वादकांनी जिंकली रसिकांची मने -बासरीच्या स्वरात न्हाले जीवन गाणे;यांच्या बरसातीने रसिक चिंब

Next Post
परिवर्तनच्या वेणुत्सवात  ४५ बासरी वादकांनी जिंकली रसिकांची मने -बासरीच्या स्वरात न्हाले जीवन गाणे;यांच्या बरसातीने रसिक चिंब

परिवर्तनच्या वेणुत्सवात ४५ बासरी वादकांनी जिंकली रसिकांची मने -बासरीच्या स्वरात न्हाले जीवन गाणे;यांच्या बरसातीने रसिक चिंब

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d