Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ब-सत्ता मिळकतीचा धारणाप्रकार बदलण्याबाबत कोणतीही अडचण नाही -कृषी मंत्री

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
02/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
विमा कंपन्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात -कृषिमंत्री

मालेगाव(उमाका वृत्त सेवा)- ब-सत्ता प्रकार म्हणून नोंदविलेल्या आणि निवासी, कृषिक, वाणिज्यीक, औद्योगिक प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग-1 या धारणाधिकारामध्ये रुपांतर करण्याबाबत मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत. ब-सत्ता प्रकार मिळकतीचा धारणाप्रकार बदलण्याबाबत कोणतीही अडचण नसून नागरिकांनी नगर भूमापन कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह डिसेंबर 2021 पुर्वी अर्ज दाखल करावे असे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

शासकीय विश्रामगृहात आयोजित ब-सत्ता प्रकाराच्या कामकाजाची आढावा बैठक कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मायादेवी पाटोळे, नगर भुमापन अधिकारी किरण चौधरी, उप अधिक्षक भुमी अभिलेख राहुल पाटील, दुय्यम निबंधक श्री.भोये, वाघ, लहाने, बंडू माहेश्वरी, राजेंद्र साळुंखे, शाम अग्रवाल, रणभोर, सखाराम घोडके, किशोर बच्छाव, ॲड.सतिष कजवाडकर, ॲड.बच्छाव यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

ब-सत्ता प्रकरणांचा धारणाधिकार रुपांतरीत करण्यासह यातून झालेल्या शासकीय वसुलीच्या कामाचा आढावा घेवून समाधान व्यक्त करतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, उर्वरित सर्व ब-सत्ता प्रकार मिळकत धारकांना शासनाच्या मार्गदर्शक सुचना माहित होण्यासाठी वैयक्तीक नोटीसीने कळविण्यासह याबाबत जनजागृती होण्यासाठी शिबीरांचे आयोजन करुन उर्वरित प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. संबंधित अर्जदार यांचेकडून कमीत कमी कागदपत्रे प्राप्त करुन शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी उप अधिक्षक भुमी अभिलेख, नगर भुमापन, दुय्यम निबंधक व अपर जिल्हाधिकारी या कार्यालयांनी समन्वय ठेवून कामकाज करावे. तसेच झालेल्या प्रगतीकामाचा आढावा घेण्यासाठी नियमीतपणे बैठकांचे आयोजन करण्याबाबतही मंत्री श्री.भुसे यांनी सुचना दिल्या.

Team Satymev Jayate

Previous Post

अठरावं सरलं…! मतदार यादीत नाव नोंदवलं?

Next Post

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या विविध उपाययोजनांसाठी ५६ कोटी ४ लाख ८३ हजार रुपयांचा निधी वितरित

Next Post
भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या विविध उपाययोजनांसाठी ५६ कोटी ४ लाख ८३ हजार रुपयांचा निधी वितरित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo