Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भगवान महावीर जयंतीच्या औचित्याने ‘लुक एन लर्न’ च्या चिमुकल्यांचे उत्कृष्ट सादरीकरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/04/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
भगवान महावीर जयंतीच्या औचित्याने ‘लुक एन लर्न’ च्या चिमुकल्यांचे उत्कृष्ट सादरीकरण

जळगाव दि. (प्रतिनिधी) श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती – २०२४ द्वारा आयोजित शासनपती भगवान महावीर स्वामी यांच्या २६२३ जन्म कल्याणक महोत्सवाच्या औचित्याने सायंकाळी ०७.३० पासून ‘लुक एन लर्न व अन्य महिला मंडळा तर्फे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रस्तुती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे दीप प्रज्ज्वलन जैन इरिगेशनचे चेअरमन श्री. अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते तर श्री भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष पारस राका, नयनतारा बाफना, ज्योती जैन, ताराबाई डाकलिया व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आरंभी कच्छी दशा वीसा मंडळा तर्फे नमोकार मंत्र तर जे पी पी महिला मंडळाच्या सदस्यांनी स्वागत गीत सादर केले.

‘लुक एन लर्न’ च्या सुमारे १४० लहान बालकांनी एक तास या कार्यक्रमात सहभाग घेऊन आपल्यातील छुप्या कलात्मक प्रस्तुति सादर केल्या. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, बोधप्रद कार्यक्रमातून भगवान महावीर स्वामी यांचा सुयोग्य संदेश देण्यात आला. ह्या सादरीकरणाला जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन सपत्नीक उपस्थित राहून देत सहभाग्यांना प्रोत्साहन दिले. विजेत्या स्पर्धकांना अशोक जैन, ज्योती जैन, समितीचे अध्यक्ष पारस राका, सौ किरण बोरा, चंद्रकांता मुथा, रिना कुमट आदि मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान केले गेले.

या नंतर जैन सोशल ग्रुप, जय आनंद ग्रुप, तेरापंथ महिला मंडळ, सुशील बालिका मंडळ यांच्या धार्मिक आणि सामाजिक विषय घेवून छोटी नाटिका सादर केली. कार्यक्रमाच्या यशश्वीतेसाठी विशाल चोरड़िया, संजय रेदासनी, नरेंद्र बंब यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उमेदवारी अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही, फक्त निश्चित केलेली अनामत रक्कम भरावी लागणार

Next Post

जिल्ह्यातील 20 राष्ट्रीयकृत, खाजगी बँका 120 मतदान केंद्राच्या सजावटीसाठी आल्या पुढे

Next Post

जिल्ह्यातील 20 राष्ट्रीयकृत, खाजगी बँका 120 मतदान केंद्राच्या सजावटीसाठी आल्या पुढे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo