Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव ग्रामीण रुग्णालया समोर दुचाकीला कारची धडक,मुलासह युवक ठार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

भडगाव प्रतिनिधी:- येथील जळगाव- चांदवड महामार्गावरील ग्रामीण रुग्णालया समोर मोटारसायकल व इको व्हॅन गाडीच्या अपघातात १५ वर्षीय मुलासह १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला मंगळवारी रात्री ९ वाजता हा अपघात झाला

भडगांव ग्रामीण रुग्णालच्या समोरील चौफुलीवर गतिरोधक नसल्याने सातत्याने अपघात सत्र सुरू झाले आहे .
आज १५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मोटारसायकल व एम एच २७ – ए सी – ६८४३ या क्रमांकाच्या इको व्हॅन गाडीचा मोठा अपघात झाला. यात
लाडकूबाई माध्यमिक शाळेत इयत्ता ९ वी ला शिकणाऱ्या विद्यार्थी अमोल दीपक सोनवणे हा त्याच्या भावाचा मित्र पंकज भारत भोई या सोबत कामा निमित्त मोटरसायक वर गेला होता. याच वेळी हायवेवरून जाणाऱ्या इको व्हॅन व मोटारसायक चा वळणावर भीषण अपघात झाला यात अमोल सोनवणे राहणार यशवंत नगर खालची बर्डी या १५ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला . तर पंकज भारत भोई (वय १८ ) राहणार भोईवाडा यांस हात पाय व पोटाला गंभीर फ्रॅक्चर झाल्याने त्यास पाचोरा येथे तातडीने दाखल केले.त्याची स्थिती अतिगंभीर असल्याने त्यास अधिक उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले मात्र जळगावातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले यावेळी अपघात स्थळी युवकांची मोठी गर्दी झाली होती.दरम्यान अपघात होताच इको व्हॅन चा ड्रायव्हर गाडी जागेवर सोडून पळून गेला.
घटनास्थळी नागरीक व पोलीस कर्मचारी विलास पाटील, स्वप्नील चव्हाण, पोलीस पाटील भूषण पाटील आदी पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणली .


तातडीने गतीरोधक बसवा – नरेंद्र पाटील यांची मागणी –
भडगाव शहरातून भर गर्दीच्या भागातून हायवे जातो . त्यामुळे येथील भागात सातत्याने अपघात होत आहे . नागरिकांनी वारंवार सांगुणही हायवे प्राधिरकण चे अधिकारी लक्ष देत नाही. येथील शासकीय आयटिआय, ग्रामीण रुग्णालय चौफुली , शिवनेरी गेट समोर , पाचोरा चौफुली , चाळीसगाव चौफुली, हॉटेल सदिच्छा व संस्कृती हॉटेल जवळील रस्त्याला गेलेले तडे बुजुन येथे तातडीने गतिरोधक बसबीण्यात यावेत अशी मागणी नरेंद्र रमेश पाटील व यशवन्त नगर च्या नागरिकांनी केली आहे . प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी. अन्यथा सातत्याने होणाऱ्या अपघातांना हायवे चे अधिकारी व प्रशासन जाबाबदार राहील अशी भूमिका यावेळी मांडन्यात आली . रात्री हायवे अधिकाऱ्यांनी फोन उचलले नाही , मात्र पोलिसांनी हमी देत रस्त्यावर गतिरोधक साठी सूचना देणार असल्याचे सांगितले.
शिवाय येथील गतिरोधक तात्काळ न बसविल्यास अपघात झाल्यास त्याला जबाबदार धरून संबधीत अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी हि करण्यात आली आहे .


टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“जळगांव जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. रंजना गजरे यांची नियुक्ती”

Next Post

श्रीमती प क कोटेचा महिला महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

Next Post
श्रीमती प क कोटेचा महिला महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

श्रीमती प क कोटेचा महिला महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo