Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगाव तहसील कार्यालयात अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेचा 13 ऑगस्ट रोजी लिलाव होणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read


जळगाव, (जिमाका) दि. 3 – भडगांव तालुक्यात अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करणारे 17 ट्रॅक्टर/ट्रॉली वाहने जप्त करुन तहसिल कार्यालय, भडगांव येथे लावण्यात आले आहेत. या वाहन मालकांना अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक केलेबाबत दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु संबधित वाहनमालक यांनी दंडात्मक रक्कमेचा भरणा अद्याप केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 176 ते 184 मधील तरतुदीनुसार जप्त केलेल्या वाहनांवर जमीन महसुलाची थकबाकी समजून वरील तरतुदीनुसार जप्त वाहनांचा लिलाव तहसिल कार्यालय, भडगांव व शासकीय विश्रामगृह, भडगांव येथे 13 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता करण्यात येणार आहे. असे सागर ढवळे, तहसिदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, भडगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


लिलावातुन प्राप्त होणारा महसुल शासनास जमा करण्यात येणार आहे. अटाकावुन ठेवलेल्या वाहनाचे उप प्रादेशिक परीवहन अधिकारी, जळगांव यांचेकडुन मुल्यांकन प्राप्त झाले असून या मुल्यांकनानुसार उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा यांचेकडुन लिलाव करणेस मंजुरीही प्राप्त झाली आहे. तरी या वाहन मालकांनी विक्रीकरीता निश्चित केलेल्या तारखेपुर्वी देय रक्कम शासन जमा करावी अन्यथा या वाहनांचा लिलाव करण्यात येईल.
लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या मालमत्तेची हातची किंमत, अनामत रक्कम तसेच लिलावाच्या अटी व शर्ती याकरिता तहसिलदार, भडगांव यांचे कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असेही श्री. ढवळे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर

Next Post

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय…

Next Post
३० मे २०२१ रोजी जाहीर आदेशासंबंधी अतिरिक्त स्पष्टीकरण

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo