Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगाव मारहाणप्रकरणातील मयत गजानन राणे यांच्या कुटुंबियांचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले सांत्वन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
भडगाव मारहाणप्रकरणातील मयत गजानन राणे यांच्या कुटुंबियांचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले सांत्वन

मुंबई, दि. 8 : जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे जमावाच्या जबर मारहाणीत वायरमन गजानन राणे यांचा मृत्यू आणि उप कार्यकारी अभियंता अजय धामोरे जखमी होण्याची अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचे सांगून गजानन राणे यांचे सुपुत्र शुभम राणे यांच्याशी दूरध्वनीवर बोलून त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, अशी  माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

डॉ. राऊत पुढे म्हणाले, राणे कुटुंबाला शक्य ती सर्व मदत केली जाईल. तसेच उप कार्यकारी अभियंता धामोरे यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधून दिलासा दिला. दूरध्वनीवर बोलताना श्री. धामोरे यांनी सर्व सबस्टेशनवर सीसीटीव्ही लावण्याची विनंती केली असून त्यावर सकारात्मक विचार केला जाईल.

पीडित कुटुंबाची भेट घेऊन या विषयावर प्राथमिक माहिती घेण्याच्या व पुढील कारवाई करण्याच्या सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना दिले आहेत. ते लवकरच महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडखे यांना जळगावमध्ये पाठवणार आहेत. पीडित कुटुंबातील सदस्य आणि सर्व संबंधितांशी बोलून अहवाल तात्काळ पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

“हा अहवाल आल्यानंतर तो गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सादर करून या प्रकरणी सखोल तपासासाठी विनंती करणार आहे. तसेच भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांना आवश्यक त्या सूचना देण्याची विनंतीही करणार आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही मी देतो.” असेही डॉ. राऊत यावेळी म्हणाले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

Next Post

कोविडमुळे अनुपस्थित राहणाऱ्यांना पुन्हा परीक्षेची संधी – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा पुढाकार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d