Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी -सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
15/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी -सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई(प्रतिनिधी)- आगामी काळात शासनाच्या सर्व विभागांमध्ये पद भरती करताना उमेदवारांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही अशा पद्धतीने भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी व परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी व परीक्षा घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या संस्थांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्त्याखालील शासकीय कार्यालयातील पदभरतीच्या अनुषंगाने सुधारित परीक्षा पद्धती संदर्भात आज मंत्रालयात श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव प्रशांत साजणीकर, महाआयटीचे मुख्य परिचालन अधिकारी प्रसाद कोलते, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अवर सचिव सुधीर निकाळे तसेच परीक्षा घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.परीक्षा देणाऱ्या उमेदवाराची चेहरा ओळख सांगणारे तंत्रज्ञान तसेच जॅमर लावणे यासारख्या उपायांचा समावेश परीक्षा पद्धतीत करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

परीक्षा घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या संस्थांनी पेपर फुटू नये व डमी उमेदवार परीक्षेस बसू नये यादृष्टीने काळजी घ्यावी. परीक्षेत काही गडबड झाल्यास संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशाराही राज्यमंत्री श्री.भरणे यांनी दिला.

Team Satymev Jayate

Previous Post

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय

Next Post

पर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo