Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या संघाची राष्ट्रीय स्तरावर निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचा राष्ट्रीय स्तरावर निवड झालेला संघ

जळगाव, दि. 7 (प्रतिनिधी) – केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई मार्फत दिनांक ०३/०१/२०२१ रोजी दुपारी ४ वाजेपासुन ऑनलाईन पद्धतीने राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे २०२० चे आयोजन करण्यात आले होते. त्यात भवरलाल अँड कांताबाई जैन  फाऊंडेशनतर्फे लोकनृत्य सादर करण्यात आले.  महाराष्ट्रातून मुंबई, नाशिक,  औरंगाबाद, नागपुर, अमरावती, लातुर, पुणे, कोल्हापुर या ८ विभागांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यात भवरलाल अँड कांताबाई जैन  फाऊंडेशनला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला. हा संघ पुढच्या फेरीसाठी दि.१२/०१/२०२१ रोजी होणा-या राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवडला गेला.

या संघातर्फे लोकनृत्य प्रकार करण्यात आला होता. यासोबतच एकपात्री, शास्त्रीय गायन, शास्त्रीय वादन, कथ्थक, बासरी वादन आणि वक्तृत्व आदी स्पर्धाही होत्या. लोकनृत्य प्रकारातील स्पर्धेत जैन फाऊंडेशनच्या सहभागी स्पर्धकांनी प्रतिनिधीत्व केले.

सहभागी कलावंत अजय गोसावी, रितीक पाटील, निर्मल राजपुत, हेमंत माळी, योगेंद्र बीसेन,  सुमीत भोये, रोहन चव्हाण, मंगेश चौधरी, मोईन शेख आदी कलावंत स्पर्धकांचे भवरलाल अँड कांताई जैन  फाऊंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी अभिनंदन केले आहे. स्पर्धेसाठी सौ. रुपाली वाघ यांनी समन्वय साधला तर  त्यांना कला शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे व निलेश बारी यांनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पिंपळगांव कमानी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये सौ.अनुसया अशोकराव चव्हाण यांची बिनविरोध निवड

Next Post

कोरोना लसीकरणासाठी ठाणे जिल्हा सज्ज;पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सराव चाचणी(ड्राय रन) मोहिमेचा शुभारंभ

Next Post
कोरोना लसीकरणासाठी ठाणे जिल्हा सज्ज;पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सराव चाचणी(ड्राय रन) मोहिमेचा शुभारंभ

कोरोना लसीकरणासाठी ठाणे जिल्हा सज्ज;पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सराव चाचणी(ड्राय रन) मोहिमेचा शुभारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo