Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउण्डेशनतर्फे शहरातील पुतळे, उद्याने, चौक सुशोभित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव, दि. 26 (प्रतिनिधी) –  आनंदाची उधळण करत येणारा, प्रत्येक घराघरात चैतन्य देणारा सण म्हणजे दिवाळी.  या उत्सवाच्या काळात प्रत्येक जण आपलं घर, परिसर उजळण्यासाठी कार्यरत असतो. मंगलदायी असणारा हा सण बाजारपेठेत चैतन्य आणतो.  विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी नागरिकांची पावले बाजारपेठेकडे वळतात. या दिवाळी सणाच्या काळात शहरातील महापुरूषांची पुतळे, चौक, उद्याने हे विद्युत रोषणाईने उजळावी यासाठी गेल्या दोन वर्षांपासून भवरलाल आणि कांताबाई जैन फाउण्डेशन यांच्यावतीने आकर्षक रोषणाई करण्यात येते.
या काळात लाल बहादूर शास्त्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा गांधी, विनायक सावरकर आदि महापुरुषांच्या पुतळ्यांवर अत्यंत आकर्षक व देखणी रोषणाई करण्यात आली आहे. यासह जळगावची ओळख असलेले शास्त्री टॉवर तसेच महात्मा गांधी उद्यान आणि भाऊंच्या उद्यानाचा परिसर सुशोभित करण्यात येऊन विविधरंगी रोषणाई करण्यात आली आहे. प्रेरणा देणाऱे महापुरूषांचे पुतळे या दीपोत्सवात रोषणाईने अधिकच प्रेरणादायी वाटतात.
वर्षभर विविध औचित्याच्या निमित्ताने जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.  व भवरलाल आणि कांताबाई जैन फाउण्डेशन यांच्यावतीने काव्यरत्नावली चौक सुंदर, आकर्षक संदेश देणाऱ्या फलकांद्वारे सुशोभित करण्यात येतो. दीपावलीच्या या पर्वातही काव्यरत्नावली चौकात दीपोत्सवाच्या अनुषंगाने आकर्षक, सुंदर संदेशासह फलक लावण्यात आले असून या चौकाच्या चारही बाजूला देखणे आकाश कंदील लावण्यात आल्याने हा चौक रोषणाईने न्हाऊन निघालेला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फटाकेमुक्त दिवाळीचे आदर्श शिक्षकाकडून आवाहन

Next Post

दिवाळीच्या फराळाचे विश्वसनीय एकमेव ठिकाण श्री बालाजी बिकानेर माठाईवाला…

Next Post

दिवाळीच्या फराळाचे विश्वसनीय एकमेव ठिकाण श्री बालाजी बिकानेर माठाईवाला...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo