Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भवरलाल जैन यांच्या श्रद्धावंदन दिनी अनुभूती निवासी स्कूलतर्फे रोजी २५ ‘भक्ती संगीत संध्या’ चे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/02/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read


जळगाव दि.२४ प्रतिनिधी – औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार मूल्ये रूजविणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या श्रद्धावंदन दिनी उद्या दि. २५ फेब्रुवारी विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती संगीत संध्या’ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘भक्ती संगीत संध्या’ भाऊंच्या उद्यानामधील अॅम्पी थॅएटर येथे संध्याकाळी ६ वाजता होईल. यामध्ये विद्यार्थ्यांकडून किबोर्डसह इतर वाद्यांच्या साथ संगतीने गायनातून भवरलाल जैन यांचे प्रेरणादायी स्मरण केले जाईल. कार्यक्रमावेळी अनुभूती निवासी स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन यांची प्रमुख उपस्थिती असेल.


अनुभूती निवासी स्कूल निसर्गाच्या सान्निध्यात शंभर एकर परिसरात विस्तारली आहे. याठिकाणी इयत्ता ५ व ते ६ वी मधील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी डे बोर्डींग तर इयत्ता ७ वी ते १२ पर्यंत पूर्ण निवासी आहे. ‘इथे शिकणारा विद्यार्थी नोकरी मागणाऱ्यापेक्षा तो नोकरी देणारा ठरावा’ या विचारांनी या शाळेची वाटचाल सुरू आहे. स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अनुभूती स्कूल कडे पाहिले जाते. विद्यार्थ्यांशी भवरलाल जैन सुसंवाद साधायचे. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकडे परिपूर्ण लक्ष असायचे हाच संस्कार आजही अनुभूती निवासी स्कूलमध्ये तंतोतंत पाळला जातो. या श्रद्धेपोटी विद्यार्थ्यांनी विशेष भक्ति संगीत संध्या चे आयोजन केले आहे. भक्ती संगीत संध्यामध्ये प्रेम, आपुलकी व सामाजिक बांधिलकीतून संवेदनशील समाज निर्मितीसाठीचे योगदान अधोरेखित केले जाणार आहे. गीतांच्या शब्दांमधील अर्थासह श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या कार्याचे स्मरण केले जाईल. विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट शैलीमध्ये निवेदनही सादर केले जाईल. या भक्ती संगीत संध्येला उपस्थिती राहून नागरिकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन अनुभूती निवासी स्कूलच्या व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विद्यापीठ स्तरीय एक दिवशीय युवा संसद कार्यशाळा यशस्वी संपन्न

Next Post

लोहारा येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

Next Post
लोहारा येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo