Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘भारताने जगाला बुद्ध दिला,पण बुद्ध उपयोगाचा नाही,असे वक्तव्य करुन मनोहर भिडे यांनी ओकली गरळ;जनतेच्या संतप्त प्रतिक्रिया

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/09/2019
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
‘भारताने जगाला बुद्ध दिला,पण बुद्ध उपयोगाचा नाही,असे वक्तव्य करुन मनोहर भिडे यांनी ओकली गरळ;जनतेच्या संतप्त प्रतिक्रिया

जळगाव (धर्मेश पालवे) :-दिनांक 29 संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आपल्या भाषणात म्हणाले की भारताने जगाला बुुद्ध दिला, मात्र त्यांच्या याच वक्तव्यावर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आक्षेप घेतला आहे. भारताने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध उपयोगाचा नाही तर विश्वाचा संसार चालवण्यासाठी संभाजी महाराजच पाहिजे, असं भिडे म्हणाले. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या पेक्षा मनु श्रेष्ठ होता, आंबेडकरांनी घटना ही मनुस्मृती डोळ्यासमोर ठेवून लिहिली अशी बेधडक व खोटी तसेच इतिहासाला खोटं ठरवणारे भिडे यांनी वक्तव्य या आधीही आपल्या भाषणात केली आहेत, व याबाबत बर्‍याचवेळा भारतात मोठ्या प्रमाणात टीका त्यांना सहन करावी लागली आहे. अगदी याच प्रमाणे आता पुन्हा भिडे यांनी पंतप्रधान अमेरिकेत चुकीचे बोलले आहेत,मी त्यांना महाराष्ट्रात करेक्ट करतो, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान खोटे बोलत असल्याचे सांगितले.नवरात्री उत्सवानिमित्त मनोहर भिडे दुर्गामाता दौड यात्रेत सहभागी झाले होते. तरूणांमध्ये हिंदू धर्मा च्या नावाखाली तरुण पिढी च्या डोक्यात विष पसरविण्याचे काम भिडे नेहमीच करत आले आहेत. त्यांनी 1982 मध्ये सांगलीत शिवप्रतिष्ठानची स्थापना केली तेव्हा पासून महापुरुषांचा इतिहास लपवून त्यांना बदनाम करण्याचा आणि तरुण मुलांचे माथे भडकावून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम भिडे यांनी केले आहे. भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या आरोपात भिडे हे आरोपी आहेत, नुकतेच भिडेवर तसे आरोप  दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने पोलिसांना दिले असताना पुन्हा भिडेने विष ओकत बुद्ध काही उपयोगाचे नसल्याचे म्हनाले मात्र, भिडेंना हे माहीत नाही की संभाजी राजांनी सन १६७८ ला बुद्धभूषण ग्रंथ लिहून बुध्दांच्या विचारांची गरज संपूर्ण जगाला असल्याची जाणीव करून दिली होती, असा इतिहास असतांना भिडे मात्र अपप्रचार करुन भारतात जातीय तेढ निर्माण करण्याचे व तरुणाची माथे भडकवण्याचे महापाप करत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेकांनी नोंदवल्या आहेत. सोशियल मीडिया तुन जनतेच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत असल्याचं दिसत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मौलाना आझाद फाऊंडेशनचा नवरात्रोत्सव अनोख्या पध्दतीने साजरा

Next Post

पळसोद येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

Next Post
पळसोद येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

पळसोद येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo