Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतीय लोक प्रशासन संस्थेतर्फे बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
26/11/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
भारतीय लोक प्रशासन संस्थेतर्फे बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन

मुंबई(प्रतिनिधी)- भारतीय लोक प्रशासन संस्थेतर्फे बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा २०२१-२०२२ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून ‘मिशन कर्मयोगी लोक सेवा वितरणासाठीची क्षमता वाढवणे’ आणि ‘भारत सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण’, यापैकी कोणत्याही एका विषयावर इंग्रजी किंवा मराठी भाषेत २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत निबंध पाठवावेत, असे आवाहन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेमार्फत करण्यात आले आहे.निबंध तीन हजार शब्दांपेक्षा कमी आणि पाच हजार शब्दांपेक्षा जास्त नसावा.

निबंध विषयाच्या अनुषंगाने विश्लेषणात्मक, संशोधनपर व पदव्युत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे. निबंध कागदाच्या एकाच पृष्ठभागावर टंकलिखित करून त्यावर केवळ टोपणनाव लिहून चार प्रतीत मानद सचिव, भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा, तळ मजला, बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग. मुंबई- ४०००३२ या पत्त्यावर पाठवावा.

स्पर्धकाने निबंधावर आपले नाव किंवा कोणत्याही प्रकारची ओळख नमूद करू नये. निबंधाच्या प्रती व त्या सोबत वेगळ्या लिफाफ्यात स्पर्धकाचे नांव (मराठी व इंग्रजीतून टोपणनाव, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी नमूद करून पाठवाव्यात.निबंध स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.

या स्पर्धेसाठी पुढीलप्रमाणे चार पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत– पहिले पारितोषिक – ७ हजार ५०० रुपये, दुसरे पारितोषिक – ६ हजार रुपये, तिसरे पारितोषिक – ३ हजार ५०० रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक २ हजार रुपये असून अधिक माहितीसाठी www.iipamrb.org.in या संकेतस्थळाला भेट द्या. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखेचे कार्यकारी सहसचिव नितीन वागळे यांनी केले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल -गृहमंत्री

Next Post

इमाव विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना होणार सुरू  -इतर मागास बहुजन कल्याणमंत्री

Next Post
अतिवृष्टीग्रस्तांना मंजूर झालेल्या ३६५ कोटी ६७ लाख रुपयांचे “असे होणार” मदतीचे वाटप -मंत्री विजय वडेट्टीवार

इमाव विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना होणार सुरू  -इतर मागास बहुजन कल्याणमंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo