Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भूमिपुत्रांच्या सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प-अशोक जैन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प डिजीटल अर्थसंकल्प म्हणावा लागेल. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचे महत्त्व खूप असून मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मितीचे माध्यमही कृषीक्षेत्र आहे. या कृषीक्षेत्राच्या स्टार्टअपसाठी ड्रोनशक्ती योजना महत्त्वपूर्ण ठरू शकते. पिक फवारणी/ देखरेखीसाठी याचा वापर होणार असून सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. तेलबिया, फळ, भाजीपाला उत्पादनासाठी प्रोत्साहन आणि सौर ऊर्जेवर भर या बाबी कृषिक्षेत्राच्या विकासाला चालना देऊ शकतात.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे पृर्नगठन करताना त्यात कृषीक्षेत्राचा अधिक विकास व्हावा, पाण्याचा तूटवडा लक्षात घेता शेतीत सूक्ष्म सिंचन वाढविणे यांवर भर दिला जाईल, शेतकऱ्यांना वाढीव लाभ, अन्न सुरक्षा आणि शाश्वत शेती विकसीत व्हावी यासाठी भरीव तरतूद केली आहे. ग्रामीण भागातील नेटवर्क आणि इंटरनेट सुविधांमुळे ई-कम्युनिकेशन सोपे होऊन जगातील उपयुक्त तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचेल. ९ लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी आणि ‘हर घर, नल से जल’ द्वारे ३.८ कोटी घरांमध्ये नळाचं पाणी पोहचविण्यासाठी भरीव तरतूद या डिजीटल अर्थसंकल्पाची जमेची बाजू म्हणता येईल. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश केल्याने संशोधनाला चालना मिळेल. डिजिटल विद्यापीठाची सुद्धा महत्त्वपूर्ण तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आल्याने याचा सकारात्मक परिणाम आगामी काळात जाणवेल असे वाटते.– अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम ली. जळगाव

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

१ फेब्रुवारीपासून कोविड रोखण्यासाठी नवीन नियमावली लागू-काय सुरू काय बंद जाणून घ्या एका क्लिक वर…..

Next Post

अबब… महिलेच्या पोटातून काढला चक्क १५ किलोचा गोळा !

Next Post
अबब… महिलेच्या पोटातून काढला चक्क १५ किलोचा गोळा !

अबब… महिलेच्या पोटातून काढला चक्क १५ किलोचा गोळा !

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo